
- एनआरसी आणि कॅब या दोन कायद्याविरोधात देशभरात आगडोंब उडाला
पुणे : एनआरसी आणि कॅब या दोन कायद्याविरोधात देशभरात आगडोंब उडाला आहे. या कायद्याला वंचित बहुजन आघाडीचा सुरुवातीपासून विरोध आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच वेळोवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही आपली भूमिका मांडली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तसेच ते म्हणाले, हा कायदा फक्त मुस्लिम समूहांच्या विरोधात नाही. तर इतर समूहदेखील इथे लक्ष्य झाला आहे. हे दोन्ही कायदे देशाला मारक आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लवकरच राज्यभरातील समविचारी संघटनांशी बोलून राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहोत. नवीन वर्षाच्याआधीच आंदोलनाचे पाऊल उचलणार आहोत.
आणखी वाचा - विद्यार्थ्यांवर लाठीमार करणारा; ABVP, RSSचा तरुण नाही
दरम्यान, राज्यातील जनतेला आमचे आवाहन आहे, की या दोन्ही बिलाच्या विरोधात हाक दिल्यावर आपण मोठ्या ताकदीने पाठीशे उभं राहावे.