प्रकाश राज यांच्याविरोधात वॉरंट

प्रकाश राज यांच्याविरोधात वॉरंट
Published on

प्रकाश राज यांच्या
विरोधात वॉरंट

बंगळूर, ता.२३ ः अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडले असून एकाचवेळी अनेक ओळखपत्रे वापरल्याच्या प्रकरणात न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात बंगळूर न्यायदंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. प्रकाश राज यांना नियमांचे पालन करण्यात अपयश आल्याचा ठपका न्यायालयाकडून ठेवण्यात आला आहे. विधिज्ञ दिलीपकुमार यांनी बंगळूरमधील हलासुरू गेट पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांना केवळ एकाच ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी आहे. प्रकाश राज यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून आपण नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com