Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

Pune Municipal Election: जाणून घ्या, राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगतापांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबत काय म्हटलंय?
Prashant Jagatap resigning as Pune city president, delivering a major political setback to Sharad Pawar’s party ahead of the Pune municipal elections.

Prashant Jagatap resigning as Pune city president, delivering a major political setback to Sharad Pawar’s party ahead of the Pune municipal elections.

esakal

Updated on

Prashant Jagatap Resigns as Pune City President : आगामी महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण, पक्षाचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील प्रमुख नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने खळबळ उडाली आहे. वे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहाराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, प्रशांत जगताप यांनी मीडियाला आपल्या या निर्णयाची माहिती दिली. प्रशांत जगताप यावेळी म्हणाले, ''शरद पवारांवर नितांत प्रेम, विश्वास कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील. २६ वर्षे सहा महिने आणि १४ दिवस मला शरद पवारांच्या पक्षात राहता आलं. वेगवेगळ्या कामाची संधी मिळाली हा माझ्या आय़ुष्याचा खूप मोठा ठेवा मी समजतो.''

Prashant Jagatap resigning as Pune city president, delivering a major political setback to Sharad Pawar’s party ahead of the Pune municipal elections.
Abu Azmi on Bangladesh Mob Lynching : बांगलादेशात जमावाने हिंदू तरूणास बेदम मारून जाळलं ; संतापजनक घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया, म्हणाले...

तसेच, मागील काळात अजित पवारांच्या नेतृत्वात, मधल्या काळात माझ्या लाडक्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मला कामकाज करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदापासून मला आतापर्यंत मिळालेली सर्व पद ही माझ्या पक्षामुळे शरद पवारांमुळे, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच नेत्यांच्या सहकाऱ्यामुळे आणि पाठिंब्यामुळे मला मिळाली. पक्षातील माझ्या चांगल्या कामाची नोंद घेवून मला शहाराध्यक्ष पदाची संधी दिल्या गेली, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी राहील. असंही प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितलं.

Prashant Jagatap resigning as Pune city president, delivering a major political setback to Sharad Pawar’s party ahead of the Pune municipal elections.
Sheikh Hasina Statement : बांगलादेशात हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेवर शेख हसीना म्हणाल्या, ‘’हे तेच लोक आहेत का?, ज्यांना...’’

याचबरोबर, मला जी संधी मिळाली ती पक्षामुळे तर मिळालीच, परंतु मी ज्या भागात काम करतो माझा जो भाग आहे तो वानवडी परिसर हडपसर विधानसभा मतदारसंघ आणि पुणे शहरातील नागरिकांनी माझ्या प्रत्येक कृतीला, कामाला दाद दिली म्हणून मी त्यांच्या हितासाठी रस्त्यावरही उतरलो होतो. असं प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितले.

Prashant Jagatap resigning as Pune city president, delivering a major political setback to Sharad Pawar’s party ahead of the Pune municipal elections.
Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

याशिवाय, ''मागील दहा-वीस दिवसांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय. पक्ष निवडणूक कशी लढवेल यासंदर्भात आम्ही पूर्वतयारी केली होती. जाहीरनाम्यापर्यंत तयारी केलेली होती. या सगळ्या गोष्टी होत असताना, बऱ्याच अफवांना उधाण आलं आणि त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता थोडा व्यथित झाला होता. नेत्यांवर नाही, पक्षावर नाही, पण मग आपण नेमकी पुढची भूमिका काय घ्यायची? आपला पुढचा प्रवास कसा असेल, यासंदर्भात माझ्या मनात प्रचंड द्वंद सुरू होतं, विचारांची घालमेल सुरू होती. ती राहू नये असं मला वाटलं.'' असं प्रशांत जगताप यांनी यावेळी बोलून दाखवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com