पुणे : समाजकल्याण आयुक्‍तपदी दराडे, तर अतिरिक्‍त विभागीय आयुक्‍तपदी सिंघल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीण दराडे यांची समाजकल्याण आयुक्‍तपदी तर, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची पुण्याच्या अतिरिक्‍त विभागीय आयुक्‍तपदी बदली करण्यात आली आहे.

पुणे : मुंबई महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीण दराडे यांची समाजकल्याण आयुक्‍तपदी तर, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची पुण्याच्या अतिरिक्‍त विभागीय आयुक्‍तपदी बदली करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. येथील समाजकल्याण आयुक्‍त मिलिंद शंभरकर यांची सोलापूर येथे जिल्हाधिकारी पदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. दराडे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍तपदी कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी अकोला येथे सहायक जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर आणि नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

भाजपचा मास्टरस्ट्रोक; केजरीवालांच्या विरोधात यांना उमेदवारी?

जिल्हाधिकारी सिंघल यांनी सातारा जिल्ह्यात नुकत्याच उद्‌भवलेल्या आपत्तीच्या वेळी पूरग्रस्तांना मोफत धान्य, दूषित पाणीपुरवठा होऊ नये, तसेच रोगराई पसरू नये यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pravin Darade appointed as Social welfare commissioner and shweta singhal appointed as additional divisional commissioner pune