उपअधीक्षक झालेला प्रविण सांगतोय 'एमपीएससी'चा 'सक्सेस मंत्र'!

Pravin_Kunjir
Pravin_Kunjir

गराडे (पुणे) : सुरुवातीपासून अभ्यासाची आवड असल्यामुळे आणि अभ्यासात सातत्य ठेवल्याने माझी एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा २०१८ मधून सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर निवड झाली. त्याच बरोबर राज्य सेवा परीक्षा २०१८ ला मुलाखतीपर्यंत पोहोचलो; परंतु कोणतेही पद मिळाले नाही.

तरीही आत्मविश्वास न डगमगता मी पुन्हा जोमाने तयारीला लागलो. आणि राज्य सेवा परीक्षा २०१९मध्ये माझी उप अधीक्षक भूमी अभिलेख या पदावर निवड झाली, अशा शब्दांत प्रविण जगन्नाथ कुंजीर यांनी आपला प्रवास उलगडून सांगितला.

प्रविण यांचं मूळगाव पुरंदर तालुक्यातील वाघापूर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा २०१९ मध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख या पदावर त्यांची निवड झाली आहे. प्रविण यांचे वडील हे पुणे शहर पोलिस दलामध्ये वाहतूक शाखेत कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. एक छोटं मध्यमवर्गीय कुटुंब.

२०१७ मध्ये एमपीएससीच्या तयारीला सुरवात केली. महाविद्यालयीन शिक्षण संपवून खाजगी कंपनीत नोकरी स्वीकारली. ती नोकरी करत अभ्यास सुरू होता; मात्र २०१७ पासून पूर्ण वेळ एमपीएससीची तयारी चालू केली. माझ्या अधिकारी होण्याच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने कुटुंबीयांनी पाठिंबा दिला म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो.

मला असे वाटते की, जिद्द चिकाटी असेल, तर स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळते. त्याचबरोबर अभ्यासात सातत्य आणि यश मिळेपर्यत संयम बाळगणे खूप गरजेचे आहे. मी दररोज ७-८ तास अभ्यास करायचो. त्याचबरोबर पूर्वी झालेल्या परीक्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करायचो. उजळणीवर माझा जास्त जोर असायचा. माझे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न असल्याने त्यादृष्टीने मी माझी पुढची वाटचाल करीत असल्याचे प्रविण कुंजीर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com