esakal | हलगर्जीपणा कराल तर याद राखा; विभागीय आयुक्तांचा कंपन्यांना इशारा!
sakal

बोलून बातमी शोधा

IAS_Sourabh_Rao

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत अनेक आमदारांनी कारखानदार आणि कंपन्यांकडून कामगारांमध्ये कोरानाचा प्रादुर्भाव होणार नाही, त्यासाठी आवश्‍यक त्या उपयोजना करीत नसल्याच्या तक्रारी केल्या.

हलगर्जीपणा कराल तर याद राखा; विभागीय आयुक्तांचा कंपन्यांना इशारा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील अनेक कंपन्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आलेल्या आवश्‍यक उपयायोजनांचे पालन करीत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नोटिसा बजाविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी (ता.१४) दिली. नोटिसा देऊनही हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्हे घटले पण...; काय सांगतो पुणे पोलिसांचा रिपोर्ट​

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत अनेक आमदारांनी कारखानदार आणि कंपन्यांकडून कामगारांमध्ये कोरानाचा प्रादुर्भाव होणार नाही, त्यासाठी आवश्‍यक त्या उपयोजना करीत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून या कारखान्यांना आणि कंपन्यांना नोटिसा बजाविण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.

पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात येत आहे. या उलट पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर संख्या वाढत आहे. त्यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे. ते होत नसल्यामुळे चाकण, रांजणगावसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना या नोटिसा देण्यात येणार असल्याचेही राव यांनी सांगितले. 

पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या अडचणी काही कमी होईनात; रक्तसाठा पडतोय कमी!​

प्लाझ्मा डोनेशनसाठी मोहीम राबविणार 
प्लाझ्मा डेनेशनसाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने विशेष मोहीम शनिवारपासून (१५ ऑगस्ट) राबविण्यात येणार आहे, असे सांगून राव म्हणाले, "प्लाझ्मा थेरपीमुळे बाधितांना उपयोगी पडत आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांकडून मात्र प्लाझ्मा डोनेशन करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामागे अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना आवश्‍यकता भासल्यास प्राधान्याने ते उपलब्ध करून देण्याबाबत त्यांच्यामध्ये जनजागृती या मोहितेत केली जाणार आहे.'' 

कोरोनाबाधित रुग्णांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले निर्देश, म्हणाले...​

खासगी रूग्णालयात प्लाझ्मा उपचार 
ससून रूग्णालयातील अत्यवस्थ (क्रिटीकल) असलेल्या रूग्णांवर प्लाझ्माद्वारे उपचार केले जातात. मात्र अन्य रूग्णालयातील अत्यवस्थ असलेल्या रूग्णांना ससूनकडून प्लाझ्मा उपलब्ध करून दिले जात नाही. परंतु आता ससूनबरोबरच खासगी अथवा सरकारी रूग्णालयातील अत्यवस्थ रूग्णांना प्लाझ्माची आवश्‍यकता असेल, तर तो उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही राव यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image