Pune Rain : उपनगरात गारांसह पावसाने लावली हजेरी; हवेत पसरला गारवा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

४-५ वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. सव्वा पाच वाजता ढगांचा कडकडाट सुरू होऊन पाऊस पडू लागला.

खडकवासला : सिंहगड, डोणजे, गोऱ्हे बुद्रुक, खानापूर मणेरवाडी परिसरात मंगळवारी (ता.२४) सायंकाळी सव्वापाच वाजता मोठ्या गारांसह पावसाने हजेरी लावली.

बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळपासून या परिसरात बऱ्यापैकी ऊन होते. सायंकाळी ४ नंतर ढगाळ वातावरण तयार झाले. शिवणे, उत्तमनगर कोंढवे- धावडे आहिरेगाव, खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, खानापूर, मणेरवाडी, खडकवाडी, कुडजे, आगळंबे, मांडवी खुर्द मांडवी बुद्रुक या परिसरात हा पाऊस झाला.

- Corona Effect : शहरात भाज्यांचा तुटवडा; हिरवी मिरची १६० रुपये प्रति किलो!

खानापूर मणेरवाडी येथे मोठ्या गारांचा पाऊस पडला 20 मिनिटे पाऊस सुरू होता, असे मणेरवाडीचे ग्रामस्थ विश्वास जाधव यांनी सांगितले. गारांचा पाऊस झाल्याने आंब्याचा मोहोर झडला आहे. तसेच शेतात काढणीसाठी आलेला गहू या पावसामुळे भिजला असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, असे अंकुश खिरीड यांनी सांगितले.

- भीलवाडामध्ये कोरोना तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचला कसा? किती खरं किती खोटं?

सव्वा पाच वाजता ढगांचा कडकडाट सुरू होऊन पाऊस पडू लागला. काही भागात धो-धो पाऊस पडत होता. साडेपाच वाजता हा पाऊस कमी झाला असला तरी ढगांचा कडकडाट सुरू होता. तो सहा वाजता वाजता बंद झाला.

- ... म्हणून डॉक्टरांनी सगळी ऑपरेशन्स पुढे ढकलली!

या ठिकाणीही कडकडाटासह पावसाची हजेरी

वारजे-माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे परिसरात पावसाला मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता सुरवात झाली. सकाळपासून या परिसरात ऊन होते. ४-५ वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. सव्वा पाच वाजता ढगांचा कडकडाट सुरू होऊन पाऊस पडू लागला. पहिल्यांदा पाऊस झाल्याने मातीचा सुगंध दरवळला. साडेपाच वाजता हा पाऊस कमी झाला असला तरी ढगांचा कडकडाट सुरू होता. पुणे

कोरोनाशी निगडीत बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Precipitation with hail in the suburbs of Pune City