

Dowry Harassment Case in Pune: Husband and Three Family Members Booked
sakal
लोणी काळभोर: आजारी सासूची सेवा करण्यासाठी विवाह करून आणल्यानंतर, पाच लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.