Pune News : राष्ट्रपती ब्रॉंझ पदकावर उमटली कोल्हापूरची मोहर

एनडीएचा १४५ वे दीक्षांत संचलन; हर्षवर्धन भोसलेची कामगिरी.
Harshwardhan Bhosale
Harshwardhan Bhosalesakal

पुणे - कोल्हापूरचा रांगडा गडी केवळ कुस्तीच्या मैदानातच नाही तर खडतर अशा सैन्य प्रशिक्षणातही बाजी मारतात. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या १४५व्या तुकडीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हर्षवर्धन भोसले याला राष्ट्रपती ब्रॉंझ पदकाने खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मुळचा कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या हर्षवर्धनने उत्कृष्ट कामगिरी करत केवळ कुटुंबाची नाही, तर मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे. हर्षवर्धनचे वडील शैलेश हे बॅंकेत रोखपाल असून आई सीमा या गृहिणी आहेत. ‘सकाळ’शी बोलताना हर्षवर्धन सांगतो, ‘‘माझे आजोबा अजित भोसले हे हवाई दलात कार्यरत होते.

लहानपणापासूनच त्यांच्या सारखे बनण्याचे माझे स्वप्न होते. त्यामुळे इयत्ता सहावीत शिकत असतानाच देहरादून येथील राष्ट्रीय मिलिटरी कॉलेजच्या प्रवेशासाठी परीक्षा दिली. त्यात माझी निवड झाली होती. खऱ्या अर्थाने तेंव्हापासूनच माझे सैन्य प्रशिक्षण सुरू झाले.’’ सैन्य महाविद्यालयात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे प्रशिक्षण पूर्ण करत हर्षवर्धनने पहिल्या प्रयत्नातच एनडीए गाठले.

तो पुढे म्हणतो, ‘एनडीएमधील तीन वर्षांचे प्रशिक्षण अत्यंत खडतर होते. मानसिक, शारीरिक क्षमतेबरोबरच तुमची नैतिक प्रशिक्षणही देण्यात आले. मी नौसेनेचा विद्यार्थी असल्याने १६ डिसेंबरला इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होईल’’

विद्यार्थी मित्रांना काय सांगशील...

- आयुष्यात आपले ध्येय निश्चित करा

- जर ते नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही

- ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने कष्ट करायला पाहिजे

- प्रामाणिक कष्टांना नक्की फळ मिळते

- कधी निराश होऊ नका, आयुष्यात संघर्षच यशस्वी करतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com