esakal | 'छत्रपती'च्या सभासदांची व कामगारांची दिवाळी होणार गोड, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

'छत्रपती'च्या सभासदांची व कामगारांची दिवाळी होणार गोड, कारण...


एफआरपीचे थकीत रक्कम व कामगारांचा पगार देण्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांचे आश्‍वासन...

'छत्रपती'च्या सभासदांची व कामगारांची दिवाळी होणार गोड, कारण...

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : दिवाळीपूर्वी सभासदांच्या उसाची थकीत  एफआरपीची रक्कम व कामगारांची थकीत देणी देवून सभासद व कामगारांची  दिवाळी गोड करण्यात येणार असल्याची माहिती श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्‍या ६५ व्या बॉयलर प्रदीपन कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील व त्यांच्या पत्नी सोलापूरच्या पोलिस उपायुक्त वैशाली पाटील व डॉ. दीपक निंबाळकर व त्यांच्या पत्नी प्रमोदिनी निंबाळकर यांच्या हस्ते आज शुक्रवार (ता. ९) रोजी करण्यात आले.  यावेळी कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, अभिजित रणवरे, अॅड. लक्ष्मणराव शिंगाडे, अॅड. रणजीत निंबाळकर ,गोपीचंद शिंदे, संतोष ढवाण तेजश्री देवकाते, कुंदन देवकाते, निवृत्ती सोनवणे, कार्यकारी संचालक जी. एम . अनारसे, अशोक मोरे, युवराज रणवरे,माजी संचालक भाऊसाहेब सपकळ उपस्थित होते.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

यावेळी काटे यांनी सांगितले की, कारखान्याने मागील गाळप हंगामामध्ये सव्वाचार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. साखरेला उठाव नसल्यामुळे   साखर विक्री झाली नाही. व्याजाचा भुर्दंड वाढत गेल्यामुळे कामगार व सभासदासमोरील अडचणी वाढत गेल्या. चालू वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मुबलक उस उपलब्ध असून १२ लाख मेट्रीक उसाचे गाळप करण्याचे कारखान्याचे उद्ष्ठि आहे. कारखाना अडचणीमधून बाहेर निघेल. तसेच पुढील गाळप हंगामातही उसाचे विक्रमी उत्पादन होणार असल्याने येणारे दोन गाळप हंगाम कारखान्यासाठी महत्त्वाचे असून कारखाना शंभर टक्के अडचणीमधून बाहेर निघणार असून सभासदांनी सर्व उस कारखान्याला  गाळपासाठी देण्याचे आवाहन केले. 

वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

थकीत एफआरपीच्या रक्कमेसाठी आत्मदहनाचा प्रयत्न... 
कारखान्यामध्ये बॉयलर प्रदीपनचा  समारंभ सुरु असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बारामती तालुक्याचे अध्यक्ष विकास धनाजी बाबर यांनी उसाच्या थकीत एफआरपी च्या रक्कमेसाठी अंगावरती डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.यावेळी पुजेसाठी बसलेल्या सोलापूरच्या पोलिस उपायुक्त वैशाली पाटील प्रसंगवधान राखून बाबर यांच्या हातातील डिझेलचे कॅन काढून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)