राष्ट्रपतींच्या शपथविधीवेळी शाकाहारी भोजन ठेवा; पुण्यातून थेट केंद्राकडे मागणी | President's Oath Program | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

President

राष्ट्रपतींच्या शपथविधीवेळी शाकाहारी भोजन ठेवा; पुण्यातून थेट केंद्राकडे मागणी

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शपथग्रहण सोहळ्यावेळी शाकाहारी स्नेहभोजन ठेवावे अशी मागणी पुण्यातून करण्यात आली आहे. शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ कल्याण गंगवाल यांनी ही मागणी केली असून या मागणीचे निवेदन ईमेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पाठवण्यात आले आहे. त्यानंतर या मागणीची जोरदार चर्चा रंगली आहे.

(President's Oath Program)

भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शुद्ध शाकाहारी आहेत. तर त्यांचा शपथविधी २५ जुलै राजी पार पडणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मंडळींना शाही भोजन आयोजित केलेल असते. शाकाहारचे महत्त्व कोरोना काळात अधोरेखित झाले असल्याने शाकाहार जगभर पोहचवण्यात मदत व्हावी यासाठी ही मागणी केल्याचे डॉ गंगवाल यांनी सांगितले. अनेक देशांतील मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असतात. विदेशातून आलेल्या दिग्गज लोकांना येथील स्वादिष्ट पदार्थांची चव चाखता यावी यासाठी ही मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, काल राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली असून त्यामध्ये भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधीपक्षाचे यशवंत सिन्हा यांना पराभूत करत विजय मिळवला. त्यानंतर आता दोन दिवसांनी राष्ट्रपतींचा शपथविधी पार पडणार आहे. या कार्यक्रमावेळी शाकाहारी भोजनाचे आयोजन केले जावे अशा मागणी पुण्यातून करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिग तसेच पर्यावरण हाणीला मांसाहार कारणीभूत असल्याने शाकाहारचा प्रसार व्हावा म्हणून ही मागणी केली असल्याचं गंगवाल यांनी सांगितलंय.