esakal | डिझेलचे दर वाढल्यामुळे ऊस वाहतुकीच्या दरातही वाढ करा
sakal

बोलून बातमी शोधा

डिझेलचे दर

डिझेलचे दर वाढल्यामुळे ऊस वाहतुकीच्या दरातही वाढ करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांना चार-पाच वर्षांपासून दरवाढ मिळालेली नाही. डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतूक दरात वाढ करण्यात यावी. ऊस वाहतुकीचे दर जाहीर केल्याशिवाय कोणताही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा जनशक्ती संघटनेने दिला आहे.

हेही वाचा: कॉसमॉसच्या ‘कॉईन एक्सचेंज’ उपक्रमाद्वारे ५० लाखांची नाणी वितरीत

या संदर्भात जनशक्ती संघटनेच्या वतीने सहकार मंत्री आणि साखर आयुक्तांना सोमवारी निवेदन देण्यात आले. त्यानुसार २०१६-२०१७ पासून वाहतूक दरामध्ये वाढ झालेली नाही. त्या वेळी डिझेलचा दर ६४ रुपये प्रतिलिटर होता. सध्या डिझेलचा दर जवळपास शंभर रुपये प्रतिलिटर झाला आहे. तरीही साखर कारखानदार वाहतूकदारांना दरवाढ देण्यास तयार नाहीत. शेतकरीही ऊस वाहतुकीचा व्यवसाय करीत आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याचा कारखानदार गैरफायदा घेत आहेत. वाहन घरी ठेवणे शेतकऱ्यांना परवडत नाही. यापूर्वी वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्यांकडून अॅडव्हान्स रक्कम दिली जात होती. परंतु आता काही कारखाने ते सुद्धा देत नाहीत. ऊस वाहतूक करणाऱ्या कारखान्याकडून वाढ मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे. साखर आयुक्त आणि सर्व कारखानदारांनी गाळप हंगाम सुरू होण्याच्या दिवशी ऊस वाहतूक दरवाढ जाहीर करावी.

हेही वाचा: Pune : गृहनिर्माण संस्थांसाठी निवडणूक प्रशिक्षण ॲप

हंगामाच्या कालावधीत विविध वाहतूक शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत असतात. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जनशक्ती संघटनेकडून दीड-दोन महिन्यांपूर्वी निवेदन देण्यात येत आहे. जेणेकरून कारखानदारांना निर्णय घेणे सोपे होईल. सर्व साखर कारखानदारांनी वाहतूक दरवाढीबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केली आहे.

loading image
go to top