esakal | पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःत बदल घडविणे आवश्‍यक : डॉ. रस्तगी
sakal

बोलून बातमी शोधा

Environment

पृथ्वी, ग्रह, तारे हे मानवाआधीही होते आणि नंतरही राहणार; पण पर्यावरणाच्या हानीमुळे मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला आणि प्राण्यांना भोगावे लागणार आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःत बदल घडविणे आवश्‍यक : डॉ. रस्तगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "आपण पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी बॅटरीची इलेक्‍ट्रिक वाहने आणण्याच्या गोष्टी करतो. परंतु त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या नव्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार याचा विचार करतो का? केवळ तंत्रज्ञांवर अवलंबून राहून पर्यावरण संवर्धन होणार नाही. त्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत बदल करणे, आपल्या वैयक्तिक सवयी सुधारणे आवश्‍यक आहे,'' असे मत भारताच्या पत्र सूचना कार्यालयाचे (पीआयबी) संचालक डॉ. निमिष रस्तगी यांनी व्यक्त केले.

विज्ञानप्रेमींसाठी सुवर्णसंधी! जगातल्या सर्वांत मोठ्या व्हर्चुअल विज्ञान महोत्सवात सहभागी व्हा!

'तेर (टीईआरआरई) पॉलिसी सेंटरद्वारे आयोजित 'तेर ऑलीम्पियाड' स्पर्धेच्या ऑनलाइन पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. सेंटरच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे, टाटा मोटर्सच्या पॅन इंडियाचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी तसेच स्पर्धक आणि शिक्षक या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी झाले होते. इयत्ता पाचवी ते पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या या स्पर्धेत देशातून दोन लाख 74 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Elgar Parishad : सर्व बाबी तपासूनच परवानगी द्यावी : ब्राह्मण महासंघ​

डॉ. रस्तगी म्हणाले, "पृथ्वी, ग्रह, तारे हे मानवाआधीही होते आणि नंतरही राहणार; पण पर्यावरणाच्या हानीमुळे मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला आणि प्राण्यांना भोगावे लागणार आहेत. म्हणून आपणच आता जागे होण्याची आवश्‍यकता आहे. आपल्या भविष्यासाठी व शाश्वत पर्यावरणासाठी वैयक्तिक पातळीवर तसेच मोठ्या संस्थांच्या पुढाकाराने काम करणे आवश्‍यक आहे.''

Coronavirus: युरोप,दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी होणार​

"नवीन पिढीमध्ये पर्यावरणाविषयी केवळ सजगता वाढावी एवढेच नव्हे तर त्याविषयीचा अनुभव घेता यावा यादृष्टीने ही स्पर्धा आम्ही घेत आहोत. यामुळे, मुले भावनिकदृष्ट्या देखील पर्यावरणाच्या अधिक जवळ जात आहेत. हा बदल दर वर्षीच्या स्पर्धेत प्रकर्षाने दिसून येत असून त्याचा चढता आलेखही बघायला मिळत आहे.''
- डॉ. विनिता आपटे, संस्थापक अध्यक्षा, तेर पॉलिसी सेंटर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top