विज्ञानप्रेमींसाठी सुवर्णसंधी! जगातल्या सर्वांत मोठ्या व्हर्चुअल विज्ञान महोत्सवात सहभागी व्हा!

Sci_Fest_India
Sci_Fest_India

पुणे : विज्ञानाशी निगडित चित्रपट, प्रसिद्ध वैज्ञानिकांची व्याख्याने, चर्चासत्रे, विविध प्रदर्शने, उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील दिग्गजांच्या चर्चासत्रात घरबसल्या सहभागी व्हायचे असेल, तर आजच भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या (आयआयएसएफ) संकेतस्थळाला भेट द्या. कारण जगातला सर्वांत मोठा व्हर्चुअल विज्ञान महोत्सव मंगळवार (ता.22) पासून सुरू झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा आयआयएसएफचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता.25) पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात अनेक समांतर चर्चासत्रे आणि व्याख्याने पार पडणार आहेत. केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारतीच्या सहयोगातून हा विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. "आत्मनिर्भरता आणि विश्‍वकल्याणासाठी विज्ञान' हे यंदाचे महोत्सवाची मध्यवर्ती कल्पना आहे. जगात प्रथमच एवढ्या मोठ्या विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

महोत्सवातील मेजवानी : 
1) जनसामान्यांसाठी विज्ञान : गिनीच वर्ल्ड रेकॉर्ड, विज्ञान यात्रा, मीडिया कॉनक्‍लेव, सांस्कृतिक कार्यक्रम 
2) विज्ञान आणि विद्यार्थी : विद्यार्थी अभियांत्रिकी मॉडेलिंग स्पर्धा, नॅशनल सायन्स टीचर कॉंग्रेस, पूर्वोत्तर भारत विद्यार्थी कॉन्क्‍लेव, भारतातील विज्ञान शिक्षण, विज्ञान विज्ञान गाव, युवा वैज्ञानिक परिषद 
3) समावेशक विकास : महिला वैज्ञानिक आणि नवउद्योजक परिषद, दिव्यांगांसाठी विज्ञान, राष्ट्रीय सामाजिक संस्था परिषद 
4) विज्ञान आणि मानव्यविज्ञान : भारतीय वैज्ञानिक इतिहास, विज्ञान आणि तत्त्वज्ञान, विज्ञान आणि ललित कला 
5) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध : आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय वैज्ञानिकांची परिषद, आंतरराष्ट्रीय विज्ञान साहित्य संमेलन (विज्ञानिका), वैज्ञानिक डिप्लोमसी, राजदूतांचे संमेलन, राज्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांची परिषद 
6) शाश्‍वत विकास : जैवविविधता, स्वच्छ हवा, ऊर्जा, पाणी, वैद्यकीय संशोधन परिषद 
7) ग्रामीण आणि शेतीविकासासाठी विज्ञान : कृषी वैज्ञानिकांची परिषद, कृषी तंत्रज्ञान, पारंपरिक हस्तकलांसंबंधी परिषद 
8) उद्योगविश्‍व : उद्योग आणि शैक्षणिक परिषद, तंत्रज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय स्टार्टअप परिषद, खेळ आणि खेळणी 
9) नवोन्मुखता : नवभारत निर्माण परिषद, नवयुगाचे तंत्रज्ञान 

असे व्हा सहभागी 
इंटरनेट कनेक्‍टीवीटी असलेली कोणतीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते. त्यासाठी https://iisfvirtual.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. आणि सर्व कार्यक्रमांत ऑनलाइन सहभागी व्हावे. महोत्सव संपल्यानंतरही विज्ञान भारतीच्या युट्यूब चॅनेलवर सर्व व्हिडिओ पहायला मिळतील. 

विज्ञान महोत्सवात 41 हून अधिक वेगवेगळ्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विज्ञानाबरोबरच कला, मानव्यविज्ञानाला आम्ही यात स्थान दिले आहे. देशातल्या महत्त्वपूर्ण प्रयोगशाळा व्हर्चुअल स्वरूपात लोकांना पाहता येईल. 
- डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकशास्त्र आणि राष्ट्रीय अध्यक्ष, विज्ञान भारती

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com