pune news today | भोगीच्या भाज्यांच्या दरात दहा-पंधरा टक्क्यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

price of vegetables

PUNE : भोगीच्या भाज्यांच्या दरात दहा-पंधरा टक्क्यांनी वाढ

मांजरी : भोगीसाठी (Makar Sankranti) लागणाऱ्या भाज्यांच्या दरात दुप्पट ते अडीचपटीने आवक झाली असून, १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, दुपारी अडीच-तीननंतर किरकोळ व्यापाऱ्यांनी खरेदी करण्याचे थांबविले. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmers) कमी भावात शेतमालाची विक्री केली. मात्र, बाजारात माल शिल्लक राहिला नसल्याचे मांजरी उपबाजारप्रमुख विजय घुले यांनी सांगितले.(Krushi Utpanna Bazaar Samitee, Manjari Budruk)

हेही वाचा: जिंजी ते सिंहगड गरूडभरारी मोहिमेचे निम्मे अंतर पार

घुले म्हणाले की, मांजरी उपबाजारामध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. बाजारभाव हवामान बदलाचा लागवडीवर परिणाम झाल्याने आवकेवरही परिणाम होतो. अवकाळी पाऊस, हवामानातील बदल तसेच अचानक वाढलेल्या थंडीमुळे भाज्यांची आवक कमी-जात होत आहे. गेले पंधरा ते वीस दिवस भाज्यांचे दर तेजीत आहेत. भोगीसाठी अनेक शेतकरी भाज्या राखून ठेवतात आणि भोगीच्या आधी दोन दिवस भाज्यांची तोडणी करून विक्रीस पाठवितात, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: शाळा अर्ध्या उपस्थितीत सुरु ठेवाव्यात; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भोगी सणानिमित्त भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचा बाजारात तुटवडा जाणवत आहे. मटार, गाजर वगळता बहुतांश भाज्यांचे दर तेजीत आहेत, असे हांडेवाडीतील किरकोळ भाजीविक्रेते राजू उबाळे यांनी सांगितले.

मांजरी उपबाजारामध्ये भाज्यांचे प्रति क्विंटलचे दर- पावटा (४३ क्विंटल) ५,०००, ६,५०० ८,००० रुपये. वालवर (३६ क्विंटल) ५,०००, ६,५००, ८०००. पापडी (७ क्विटंल) ५,०००, १४,०००. डबल बी (१ क्विंटल) १५,०००, २०,०००. वाटाणा (९ क्विंटल) ४२००, ४६००, ५,०००. वांगी (८२ क्विंटल) ३,००० ५,५००, ८,०००. गाजर (१४ क्विंटल) १५०० २२५०, ३,०००. हरभरा (२७,८०० गड्डी) ३, ६, १०, प्रती गड्डीचा भाव.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
loading image
go to top