मूर्तिजापुरात बरसला ‘पिवळा’ पाऊस?

सर्वत्र पडले पिवळे थेंब; हवामान विभागाने दिला होता इशारा
yellow rain
yellow rainakola

मूर्तिजापूर : मुसळधार, संततधार, वादळी, ‘रिमझिम, गाभ्रीचा… अशी विविध विशेषणे आपण आजवर पावसासाठी वापरल्या गेल्याचे जाणतो. परंतु, ‘पिवळा’(yellow rain in murtijapur) हे विशेषण सोमवारी (ता. १०) मूर्तिजापूर तालुक्यात प्रथमच वापरल्या गेले. कारण, सोमवारी रात्री तालुक्यातील लाखपुरी, टाकळीसह काही गावांमध्ये चक्क ‘पिवळा’ पाऊस झाल्याचे पाहावयास मिळाले.

yellow rain
अकोला : नऊ जणांचा बळी घेणाऱ्यांची होणार चौकशी

आठवड्यापासून वातावरण कमालीचे बदलले आहे. कुठे पाऊस सुरू आहे, तर कुठे वातावरणात गारठा वाढला आहे. क्वचित गारपीट होत आहे. धुके आसमंत झाकोळून टाकत आहेत. आजारांचे प्रमाणही वाढले आहे. नेहमीपेक्षा सर्वांचीच सकाळ जरा उशिरा होत आहे. तशीच ती आजही जरा उशीराच झाली. लाखापुरीत एकेक ग्रामस्थ घराबाहेर येऊ लागला तसा एकमेकांशी चर्चा करून खातरजमा करू लागला. आपण बघतोय ते सर्वांनाच दिसतेय ना... याची खात्री करून घेऊ लागला. सर्वांनाच सर्वत्र अघटित घडलेले दिसले. चक्क पिवळ्या रंगाचे ठिपक्यांसारखे थेंब सर्वत्र आढळले व कधीतरी ऐकलेला जादूचा पाऊस म्हणजे ‘पिवळा’ पाऊस रात्री कधीतरी झाल्याची सर्वांची खात्री पटली. अंगणात, रस्त्यावर, घरांच्या छतावर, शेतात असे सर्वत्र पिवळ्या रंगाचे हे थेंब आढळले.

yellow rain
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजन

तालुक्याच्या बाजूच्या दर्यापूर तालुक्यातील टाकळी गावातही संपर्क साधला आसता, असा प्रकार घडल्याबाबत दुजोरा मिळाला. चक्क पिवळ्या पावसाचे पावडर स्वरूपातील थेंब सोमवारी पहिल्यांदाच बघितल्याबद्दल सांगत सर्वजण तर्कवितर्क करू लागले. रासायनिक अस्त्राचीही भीती काहींनी बोलून दाखाविली तर, काही जणांनी निसर्गाचा चमत्कार संबोधले.

थेंब आकाशातूनच बरसले

हे पिवळे थेंब म्हणजे पिवळ्या पावडरचे ठिपके आहेत. ते सर्वत्र असल्यामुळे मानवी प्रकार तो नक्कीच नाही. तर, ते आकाशातूनच बरसले आहेत. ड्रोनद्वारा केलेला शिडकावा असता, तर पावडर जमिनीवर पडेपर्यंत विखुरली असती. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे, याबाबत पावडरची तपासणी होऊन निष्कर्षाप्रत पोचणे आवश्यक आहे.

केरळमध्ये झाला होता पाऊस

केरळ राज्याच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी गावात नोव्हेंबर २०१५ ला असा ‘येलो रेन’ (पिवळा पाऊस) झाला होता. तोसुद्धा असाच पिवळ्या ठिपक्यांचा सकाळी झालेला पाऊस होता. जोराचा पाऊस किंवा जलधारा नव्हत्या.

yellow rain
Corona Update : अकोला जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

‘रेड रेन’चे गूढही कायम

स्काय सायक्लोन (sky cyclone) मुळे किंवा रासायनिक बादलांमुळे असा प्रकार घडू शकतो, असा अंदाज यापूर्वी संशोधकांनी काढले आहेत. परंतु, कुठल्याही निष्कर्षाप्रत अद्याप कोणी पोचले नाही. केरळ आणि श्रीलंकेत १९५७ मध्ये झालेल्या ‘रेड रेन’ चे (red rain) गुढही अद्याप कायम आहे.

yellow rain
देवदर्शनाला जातानाच काळाचा घाला, चौघांचा जागीच मृत्यू

सदर पावडरचे नमुने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवित आहोत. त्यानंतर संबंधितांकडून तपासणी होऊन नेमका काय प्रकार आहे ते कळेल?

-अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com