केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राकडून पोलिस प्रशासनाचा गौरव

li.jpg
li.jpg
Updated on

किरकटवाडी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राकडून कोरोना आपत्कालीन परिस्थितीत अहोरात्र सेवा बजावणाऱ्या हवेली पोलिस स्टेशनमधील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला व सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या पोलिस प्रशासनाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या मुख्य सभागृहात सामाजिक अंतर ठेवून हा कार्यक्रम पार पडला. हवेली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम, पोलिस कॉन्स्टेबल संतोष भापकर यांच्यासह कोरोनामुक्त झालेल्या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्राचे मुख्य संचालक अखिलेश कुमार अगरवाल, मुख्य प्रशासकीय अधिकारी राजेंद्र अस्वले, वैज्ञानिक प्रभात चंद्रा, सुरेश कुमार, रजनी देवगाडे यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

"पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या कठीण परिस्थितीत लोकांची सेवा केली आहे. खाकी वर्दीच्या आत असलेली माणुसकी या निमित्ताने लोकांसमोर आली आहे. यामध्ये अनेक पोलिस बांधवांना आपला जीव गमवावा लागला आहे. अहोरात्र राबणाऱ्या पोलिस बांधवांना प्रेरणा मिळावी व त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे म्हणून आम्ही पोलिसांविषयी हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला.-अखिलेशकुमार अगरवाल, मुख्य संचालक, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र.

"पोलिसांविषयी समाजामध्ये निर्माण झालेली नकारात्मक भावना या कोरोना आपत्कालीन परिस्थितीत बदलली आहे. अडचणीत असलेल्या नागरिकांना पोलिस प्रशासनाकडून योग्य मदत मिळाल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी आदर निर्माण झाला आहे. आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जो आमचा सन्मान करण्यात आला त्यामुळे सेवेचे समाधान व प्रेरणा मिळाली आहे.-अशोक शेळके, पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस स्टेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com