मोदी पुण्यात आले पण, 'हे' काम करायला नाही विसरले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी. वय वर्षे अवघे 68. मात्र देशाचा कारभार हाकण्याइतकेच आपल्या 'फिटनेस'लाही तितकेच महत्व देणारे मोदी. दिल्लीबरोबरच देशातील कोणत्याही राज्यात किंवा परदेश दौऱ्यातही ते योगा व व्यायाम करण्यास विसरत नाहीत. एका परिषदेनिमित्त पुण्यात मुक्कामी असलेल्या मोदी यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे योगा, ध्यानधारणा व हलकासा व्यायाम करण्यास प्राधान्य दिले. विशेषतः त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही योगाचे महत्व पटवून दिले. 

पुणे : सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी-ठाकरेंची भेट

पंतप्रधान मोदी हे आपल्या आरोग्याबाबत पुरेसे जागरुक असल्याचे त्यांच्या नियमीत योगा, व्यायाम व आहारातून स्पष्ट होते. विशेषतः आपल्या सहकाऱ्यांसह योगा करण्यासही त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते. आपल्या निरोगी आयुष्यामध्ये योगाचे सर्वाधिक महत्व असल्याचे त्यांच्या अनेक भाषणांमधून सांगत ते देश-विदेशामध्ये योगाचा प्रचार व प्रसारही करतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त त्यांना देश-परदेशात दौरे करावे लागतात. कुठेही गेले तरीही न चुकता ते योगा, ध्यानधारणा, व्यायाम करण्यावर भर देत असल्याचे दिसून आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले पोलिस महासंचालक परिषदेला मार्गदर्शन

पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे पुण्यात आगमन झाले. नेहमीप्रमाणे ते शनिवारी पहाटे पाच वाजता उठले. त्यानंतर ते राजभवन येथून आयसर या संस्थेमध्ये योगा करण्यासाठी दाखल झाले. त्यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारीही होते. त्यांनी प्रारंभी योगा, त्यानंतर ध्यानधारणा, पायी चालणे व हलकासा व्यायाम केला. त्यानंतर राजभवन येथे येऊन ताजेतवाने होत त्यांनी आपल्या दैनंदिन कामांना सुरूवात केली.

'पंतप्रधानांच्या स्वागतापासून राष्ट्रवादीच्या आमदारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले'

दरम्यान, मोदी व शहा हे दोघेही योगासाठी आयसर येथे जाणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी पहाटे अडीच वाजल्यापासूनच पाषाण व बाणेर रस्त्यांवर पोलिस तैनात करण्यात आले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi Did regular yoga and meditation In Pune