

'लोकशाहीवर विश्वास ठेवत मतदान केल्यानंतर मतदार अभिमानाने बोटावरील शाई दाखवतो. मात्र, या लोकशाहीत आत्माच उरलेला नाही. निवडणुकांवर विश्वास ठेवायचा की नाही, हा गंभीर प्रश्न सर्वांना पडला आहे,' अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे लिखित 'जनगणमन' पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.