पुण्यातील खासगी हॉस्पिटल महापालिकेच्या रडारवर

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - कोरोनाच्या संकटात जनरल वॉर्डसह आणि ‘आयसीयू’ बेडची माहिती लपविणाऱ्या खासगी हॉस्पिटलवर महापालिका बारकाईने नजर ठेवणार आहे. रुग्ण, त्यांच्यावरील उपचार, खर्च, खाटांच्या उपलब्धता जाणून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहे. परिणामी, वर्षानुवर्षे राज्य सरकार आणि महापालिकेकडून फायदे लाटणाऱ्या आणि संकटात साथ सोडणाऱ्या हॉस्पिटलच्या भूमिकांना लगाम बसेल. ही कारवाई नोटिशीपुरती न ठेवता; फौजदारी गुन्हे दाखल करण्यापासून परवानेही रद्द करण्यापर्यंत होऊ शकते, असा दमही महापालिकेने भरला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असून, आजघडीला दहा हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी अत्यवस्थ रुग्णांची संख्याही साडेपाचशेपर्यंत गेली आहे. हे आकडे वाढत जाऊन, गंभीर स्थिती निर्माण होण्याच्या शक्‍यतेने महापालिका सगळ्या पातळ्यांवर झटत आहे. संसर्गाची साखळी न तुटल्यास पुढच्या काही दिवसांत आठ ते दहा हजार खाटांची गरज भासण्याच्या शक्‍यतेने महापालिका तेवढ्या खाटांची सोय करीत आहे. त्यासाठी मोकळ्या जागा, सरकारी, खासगी इमारती ताब्यात घेत आहे.

त्याचवेळी खासगी हॉस्पिटल मात्र कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यापासून उपचाराला विरोध करीत आहेत. ‘आयसीयू बेड’ उपलब्ध नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता महापालिकेच्या हद्दीतील बहुतांशी खासगी हॉस्पिटलमधील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्णवेळ नेमणूक होणार आहे. 

आदेशाला हरताळ 
पुण्यातील १७ खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के खाटा नियंत्रित करीत त्यातील ४० टक्के जागा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश माजी आयुक्त शेखर गायकवाड यांनी महिनाभरापूर्वी दिला आहे. खाटा नियंत्रित म्हणजे, सरकारी धोरणानुसारच बिल आकरावीत, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई होईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. मात्र, बहुतांशी हॉस्पिटल व्यवस्थापनांनी आदेश पाळला नसल्याचे दिसून येत आहे. 

हॉस्पिटलकडून हात वर
खासगी हॉस्पिटलच्या भूमिकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. सवलती घेतलेल्या आणि आता उपचाराला टाळाटाळ केलेल्या एका हॉस्पिटलच्या प्रमुखाला स्वतः पवार यांनी फोन करून ऐकविले असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तरीही, त्या हॉस्पिटलकडून मदत होत नसल्याचे दिसून आले आहे. 

हॉस्पिटल्सना मिळणाऱ्या सवलती 
1) वाढीव एफएसआय
2) मिळकतरात सवलत (निवासी दराने)
3) पाणीपट्टी
4) गरीब रुग्णांवरील उपचार खर्च दीडपट दराने

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com