esakal | कोरोनामुळे खासगी शाळांवर संक्रांत; झेडपी शाळांना सुगीचे दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

School

कोरोनामुळे खासगी शाळांवर संक्रांत; झेडपी शाळांना सुगीचे दिवस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे (Corona) आर्थिक ताणाताण आलेल्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत (ZP School) शिक्षण (Education) देण्यासाठी प्राधान्य दिले आहे. चालू शैक्षणिक वर्षात (२०२१-२२) जिल्हा झेडपी शाळांमधील विद्यार्थी (Student) संख्येत ३७ हजार ३१७ ने वाढ झाली आहे. यामुळे यंदा पटसंख्येच्या बाबतीत जिल्हा परिषद शाळांना सुगीचे दिवस आले आहेत. परिणामी खासगी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने, कोरोनामुळे या खासगी शाळांवर संक्रांत आल्याची भावना जिल्हा परिषदेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. (Private Schools Crisis by Corona Education)

ग्रामीण भागातील पालकांचाही ओढा त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून वाढला होता. मागील दशकभरापासून सातत्याने खासगी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढत होती आणि जिल्हा परिषद शाळांमधील संख्या कमी होत होती. याचा फटका झेडपी शाळांमधील शिक्षकांनाही मोठ्या प्रमाणावर बसत असे. कारण विद्यार्थी संख्या कमी झाली की, पटसंख्येच्या प्रमाणानुसार तेथील शिक्षक अतिरिक्त ठरत असत.

हेही वाचा: खडकवासल्यातील फरार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी वाढल्याने आता शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत. शिवाय अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची दुसरी शाळा मिळण्यासाठी होणारी धावपळही थांबू शकणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढल्याने, कधी नव्हे ते यंदा खासगी शाळांना विद्यार्थी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागणार असल्याचे मतही या अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदा थेट अंगणवाडीतून जिल्हा परिषदेच्या शाळेत हा अनोखा प्रयोग राबविला होता. या प्रयोगानुसार पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र असलेल्या अंगणवाडीमधील सर्व बालकांच्या याद्या आपापल्या गावातील जिल्हा परिषद शाळांकडे देण्यात आल्या होत्या. या याद्यांनुसार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेत, या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण केले आहेत. कोरोनामुळे ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक स्थिती खालावली. अशा पालकांनी त्यांच्या पाल्यांचे खासगी शाळांमधील प्रवेश रद्द केले. खासगी शाळांमधील ही मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले.

हेही वाचा: काही तासांपूर्वी जन्मलेल्या बाळानं गिळली सोन्याची अंगठी

झेडपी शाळा पटवाढीची कारणे

- आर्थिक ताणाताण वाढल्याने खासगी शाळांचे विद्यार्थी झेडपी शाळात दाखल

- अंगणवाडीतील पात्र बालकांना थेट झेडपी शाळांत प्रवेश

- शालाबाह्य मुलांना जिल्हा परिषद शाळांत प्रवेश

- झेडपी शाळांत ऑफलाइन शिक्षणाची सोय

- मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश

- मोफत शालेय पोषण आहाराची सोय

बुलेट्स

- जिल्हा परिषद शाळांची संख्या --- ३ हजार ६३९

- झेडपी शाळांमधील गतवर्षीची विद्यार्थी संख्या --- २ लाख २६ हजार ९८२

- चालू शैक्षणिक वर्षातील एकूण विद्यार्थी --- २ लाख ६६ हजार ४८८

- वाढलेले विद्यार्थी --- ३७ हजार ३१७

loading image