HSC Exam 2020 : विद्यार्थ्यांनो, परिक्षेला जाताय? वाचा ही महत्वाची बातमी

Maharashtra Board HSC Exam 2020 to begin tomorrow
Maharashtra Board HSC Exam 2020 to begin tomorrow

पुणे : आयुष्याचा राजमार्ग निश्चीत करणारी इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. १८) सुरू होत आहे. राज्यातील ३ हजार ३६ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून या वर्षी पंधरा लाख पाच हजार २७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात २७३ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डा. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषेदेत ही माहिती दिली. यावेळी सचिव अशोक भोसले, शशिकांत चव्हाण उपस्थित होते. 

पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का? 

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधी होणार आहे.  या परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे. यामध्ये ८ लाख ४३ हजार ५५२ विद्यार्थी तर ६ लाख ७१ हजार ३२५ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. राज्यातील एकूण ९ हजार ९२३ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थांनी नोंदणी केली आहे. 

प्रवाशांची अडवणूक न करता खेड-शिवापूर टोल नाक्यावर झाले आंदोलन 

परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळातर्फे २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय प्रत्येक जिल्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. एक महिलांचे भरारी पथक असणार आहे. तसेच महापालिकेचे पण भरारी पथक नेमण्यात आले आहे. भरारी पथकांना ऐनवेळी विभागीय मंडळाकडून सकाळी कळवण्यात येणार आहे. 

पुणे - डझनभर मार्गांवर मेट्रो

परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी
व्हाट्सऍप वरून प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता असते. यावर प्रतिबंध आणण्यासाठी विद्यार्थांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन व साधा किंवा स्मार्ट फोन घेऊन जाण्यास बंदी आहे. तसेच परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांसह केंद्रसंचालक, परीक्षक यांना परीक्षा काळात मोबाईल वापरण्यास बंदी अाहे. या सर्वांचे मोबाईल जमा करून एका ठिकाणी ठेवले जाणार आहेत. याबाबत परीक्षा केंद्र चालकांना सक्त सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी मंडळाने हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. 

पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान प्रवासी त्रस्त

परीक्षा केंद्रावर अर्धातास आधी या
१२वीची परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन सत्रात परीक्षा होत आहेत. परीक्षा सुरू होण्याच्या आधी अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थांनी यावे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनीट आधी प्रश्नपत्रिका वाचन करण्यासाठी देण्यात येणार आहे, असे डॉ. काळे यांनी सांगितले. 

कोरोनाचा परिणाम थेट पुण्यातील खेळण्यांवर! कसा?

शाखा निहाय नोंदणी केलेले विद्यार्थी
विज्ञान ५, ८५,७३६
कला ४, ७५,१३४
वाणिज्य ३,८६,७८४
किमान कौशल्य ५७,३७३

अंगणवाडी सेविकांना हेल्थ कार्ड द्या - सुप्रिया सुळे

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन
विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अडचणी वाटल्यास त्यांच्यासाठी हेल्पलाइन सुरू आहे. त्यांचे विभागीय क्रमांक : पुणे (020) 7038752972, मुंबई (022) 27881075, 27893756, कोल्हापूर (0231) 2696101, 2696102, 2696103, अमरावती (0721) 2662608, लातूर ( 02382) 251733, कोकण ( 02352) 228480, नाशिक (0253) 2592141, 2592143, 
नागपूर (0712) 2565403, 2553501, औरंगाबाद (240) 2334228, 2334284. याशिवाय राज्य मंडळाचीदेखील हेल्पलाइन आहे. त्याचे क्रमांक : 020 25705271, 25705272.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com