प्राध्यपकांसाठी गुड न्युज; पुण्यात होणार...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

राज्यातील नव्या आणि जुन्या प्राध्यापकांना प्रशिक्षण देता यावे यासाठी राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. त्यानुसार या केंद्राचे सेनापती बापट रस्त्यावरील तंत्रशिक्षण विभागाच्या कार्यालयाजवळ या प्रशिक्षण केंद्रासाठीचे काम सुरू झाले आहे. 

पुणे : राज्य शासनातील अधिकाऱ्यांना 'यशदा'मध्ये प्रशिक्षण दिले जाते; तसेच राज्यभरातील नव्या-जुन्या प्राध्यापकांना काळानुरूप ज्ञानदान करता यावे, यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. 1 मार्चपासून हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

पुणे : चोरटा गेला 'एमएसईबी'च्या पट्ट्या चोरायला अन् बसला शॉक 
 

सेट, नेट उत्तीर्ण झालेले विद्यार्थी लगेच महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात. त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण मिळालेले नसल्याने चुकीच्या पद्धतीनेही विषय शिकवले जातात. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची आवश्‍यकता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण अनिवार्य केले असून हे प्रशिक्षण ऑनलाइन आहे. मात्र, राज्यभरातील प्राध्यापकांना एका ठिकाणी थेट प्रशिक्षण घेता यावे, यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील नव्या आणि जुन्या प्राध्यापकांना प्रशिक्षण देता यावे यासाठी राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. त्यानुसार या केंद्राचे सेनापती बापट रस्त्यावरील तंत्रशिक्षण विभागाच्या कार्यालयाजवळ या प्रशिक्षण केंद्रासाठीचे काम सुरू झाले आहे. 

माळशेजचा पतंग महोत्सव अडकला वादाच्या भोवऱ्यात कारण.... 

प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. येत्या 1 मार्चपासून प्रशिक्षण वर्ग सुरू होतील. राज्यभरात सुमारे 55 हजार प्राध्यापक कार्यरत आहेत, त्यांनाही याचा फायदा होईल. 
- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professor Training Academy to set up Pune by Higher & Technical Education Department