विद्यार्थीही 'रेडिओ जॉकी' महापालिका शाळांमधील इच्छुकांसाठी उपक्रम

program of Radio Jockey for Students in Pimpri Chinchwad municipal school
program of Radio Jockey for Students in Pimpri Chinchwad municipal school

पिंपरी : वाढत्या स्पर्धेच्या युगात स्वतःचे छंद व आवड जोपासणे महापालिका शाळेतील मुलांना अवघडच असते. मात्र, शिक्षण समितीने "हटके' विचार करत त्यांच्या स्वविकासाबरोबरच संगीताचा छंद जोपासण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांना "पुणेरी आवाज 107.8 एफएम रेडिओ'च्या माध्यमातून रेडिओ जॉकी (आरजे) बनण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे.

दूरचित्रवाणीवर विविध वाहिन्यांची चढाओढ असली तरी, अद्यापही रेडिओची जादू कायम आहे. त्यामुळे निवेदक अर्थात आरजेचे महत्त्वही तेवढेच आहे. यात करिअरची संधी उपलब्ध असल्याने बालवयातच मुलांना ते प्रशिक्षण देण्याचा विचार शिक्षण समितीच्या सभापती मनीषा पवार यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

महापालिका शाळांमधील विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या अंगी असलेल्या कलाकौशल्यांना वाव मिळत नाही. अनेकदा स्वप्न अपूर्ण राहतात. अशांच्या कलागुणांच्या विकासासाठी "पुणेरी आवाज 107.8 एफएम रेडिओ'च्या माध्यमातून प्राथमिक विभागाच्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात आरजे संकल्पना समजून घेणे, आरजेंचे विविध कौशल्य, त्यात आवाजातील चढउतार व गती यांचा अभ्यास करणे, ओघवत्या शैलीतून थेट संवाद साधणे, हजरजबाबीपणा, संभाषणकौशल्य, सर्जनशील आरजे म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी घ्यायची काळजी, याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. एक ते तीन महिन्यांचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे.


प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या संगीताच्या गोडीमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्याची शक्‍यता सभापती पवार यांनी व्यक्‍त केली आहे. या प्रस्तावास समिती सदस्या चंदा लोखंडे व रेखा दर्शले यांनी अनुमोदन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com