esakal | कृषी पर्यटनाला चालना देणार - कृषी मंत्री दादा भुसे
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture Minister Bhuse

कृषी पर्यटनाला चालना देणार - कृषी मंत्री दादा भुसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या कृषी पर्यटन धोरणासाठी कृषी पर्यटन केंद्र चालकांनी सुचवलेल्या चांगल्या सूचनांचा कृषी पर्यटन धोरणात समावेश करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

हेही वाचा: ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’मध्ये शुक्रवारपासून ‘सुगरण’ योजना

रानफुला कृषी पर्यटन केंद्र (ईगळून ता.मावळ) येथे राज्यातील कृषी पर्यटक केंद्र चालकांशी कृषी मंत्री भुसे यांनी संवाद साधला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.बी.बोटे, पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर, रानफुला कृषी पर्यटन केंद्राचे श्रीकांत चव्हाण आणि राज्यातील कृषी पर्यटक केंद्रचालक या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा: अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव विविध उपक्रमांनी सुरू

भुसे म्हणाले, कृषी पर्यटन धोरण राबविण्यास सुरवात झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांना या धोरणाची व संकल्पनेची माहिती व्हावी म्हणून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कृषी पर्यटन केंद्र प्रत्यक्ष चालविताना येणाऱ्या समस्या सोडवणे, पर्यटन केंद्रांना कर्जपुरवठा, मार्केटिंगसाठी मदत, शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे तसेच जगभर व देशभरातील कृषी पर्यटन तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी कृषी पर्यटन केंद्रावर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत. कृषी पर्यटनाच्या संबंधित राज्य सरकारच्या इतर विभागाकडूनही परिपत्रक काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची एक नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरी पर्यटकांना शांत, सुरक्षित व पर्यावरणपूरक व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे.

हेही वाचा: शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी चंद्रकांत पाटलांचे अमित शहांना साकडं

कृषी पर्यटन केंद्रांना रस्ते, वीज, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी पर्यटन धोरणात याचा समावेश करण्यात येईल. कोरोनाच्या काळात निसर्ग शेतीचे महत्व अधोरेखित झाले आहे. त्यादृष्टीनेही निसर्ग शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी पर्यटन चळवळ सशक्तपणे वाढावी, या दृष्टीने पर्यटन संचालनालय व कृषी विभागाच्या सहाय्याने प्रयत्न करत आहे. कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे भुसे यांनी सांगितले.

loading image
go to top