
सातबारा उताऱ्यापाठोपाठ आता डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्डसुद्धा भूमिअभिलेख विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या प्रॉपर्टी कार्ड पाहता येणार आहे. हे कार्ड सर्व शासकीय कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
पुणे - सातबारा उताऱ्यापाठोपाठ आता डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्डसुद्धा भूमिअभिलेख विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या प्रॉपर्टी कार्ड पाहता येणार आहे. हे कार्ड सर्व शासकीय कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह गावठाण मिळून एकूण दोन लाख ३२ हजार प्रॉपर्टी कार्ड आहेत. यातील सुमारे दोन लाख प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भूमि अभिलेख विभागाकडून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्र सरकारने ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’चे धोरण अवलंबिले आहे. त्या अंतर्गत अभिलेखांचे संगणकीकरण, फेरफार प्रकियेत सुटसुटीतपणा आणि किमान मानवी हस्तक्षेप या तत्त्वांचा स्वीकार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे विभागाचे कामकाज गतिमान आणि पारदर्शक होणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच दर निश्चित करून दिले आहेत. त्यानुसार शहरी भागातील मिळकतीचे प्रॉपर्टी कार्डचे दर हे १३५ रुपये राहणार आहे. नगरपालिका हद्दीत ९०, तर ग्रामीण भागातील मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डाचे दर हे ४५ रुपये असणार आहेत.
पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार
या संकेतस्थळावर मिळणार प्रॉपर्टी कार्ड
www.digitalsatabara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. प्रॉपर्टी कार्डसाठी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
'केंद्रातील मंत्र्यांनी भालेरावांच्या कविता ऐकाव्यात'; शिक्षणमंत्र्यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला!
हे होणार फायदे
Edited By - Prashant Patil