'नेट'च्या धर्तीवर होणार 'सेट'ची परीक्षा; यूजीसीकडे प्रस्ताव पाठवणार

Proposal for online examination of SET on the lines of Neet
Proposal for online examination of SET on the lines of Neet

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे भविष्यात घेण्यात येणारी 'सेट'ची परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) 'नेट'ची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येण्यात येते, त्यात पद्धतीने 'सेट' परीक्षा व्हावी यासाठी 'सुकाणू' समिती समोर प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र होण्यासाठी पुणे विद्यापीठातर्फे 'सेट' परीक्षा घेतली जाते. 'सेट' परीक्षेसाठी साधारणपणे राज्यभरातून एक लाख विद्यार्थी अर्ज दाखल करतात. काळानुसार 'सेट' परीक्षेच्या नियमात, परीक्षा पद्धतीत बदल केले जात आहेत. पुर्वी सेट परीक्षेसाठी तीन पेपर होते, त्यामध्ये पहिल्या पेपर मध्ये उत्तीर्ण झाले तरच दुसरा पेपर तपासला जात, मग दुसऱ्या पेपरमध्ये उत्तीर्ण झाले तर तिसरा पेपर तपासणून निकाल लावला जात होता. मात्र आता दोन पेपरच आहेत. तसेच कमीत कमी ६ टक्के निकाल लावण्याचा नियम केला आहे. 'सेट'ची ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी मोठी यंत्रणा लागते. तसेच निकाल लागण्यासही वेळ लागतो.

राष्ट्रीय पातळीवर 'यूजीसी नेट' आणि 'सीएसआयआर नेट' या दोन्ही परीक्षा 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'तर्फे (एनटीए) घेतल्या जातात. 'एनटीए'ने 'सीएसआयआर नेट' परीक्षा लाॅकडाऊन काळात ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार आता दोन्ही परीक्षा ऑनलाइन झाल्या आहेत. 

पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा कोरोना'मुळे पुढे ढकलण्यात आली. या काळात परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार होता. अचानक अशा पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नसल्याने आता डिसेंबर महिन्यात होणारी 'सेट' परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. मात्र, यापुढे होणारी सेट परीक्षा ऑनलाइन होण्याची शक्यता आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

'नेट' प्रमाणे 'सेट' परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा विचार आहे. यासाठी राज्यातील सर्व भागात परीक्षेसाठी संगणकाची यंत्रणा असणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन परीक्षेचा प्रस्ताव 'सुकाणू' समिती समोर ठेवला जाईल. त्यास मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव 'यूजीसी'कडे पाठवला जाईल. 'यूजीसी' तपासणी केल्यानंतर अंतिम मान्यता मिळेल. २०१८ पासून मध्यप्रदेशात 'सेट' परीक्षा ऑनलाइन घेतली जात आहे. 
- डाॅ. बी. पी. कापडणीस समन्वयक, सेट, पुणे विद्यापीठ

'सुकाणू' समितीमध्ये राज्यातील प्रतिनिधी
'सेट' संदर्भातील निर्णय घेण्यासाठी या सुकाणू समितीमध्ये दोन विद्यापीठाचे कुलगुरू, दोन प्राध्यापक, उच्च शिक्षण संचालक, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि 'यूजीसी'चे सहसचिव आदींचा समावेश असतो. 

खूशखबर! खूशखबर!! कांदे घ्या...; विक्रीसाठी मोबाईल ट्यून

- राज्यात इतर पात्रता परीक्षा व प्रवेश ऑनलाइन घेतल्या जातात
- राज्यातील अनेक जिल्ह्यात लॅब उपलब्ध असल्याने 'सेट' ऑनलाइन होणे शक्य
- ऑनलाइन 'सेट'मुळे निकाल लवकर लागणे शक्य
- निकालाचे विश्लेषण व मूल्यांकन करणे शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com