esakal | #PuneRains : आळंदी देवस्थानच्या पद्मावती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली
sakal

बोलून बातमी शोधा

#PuneRains : आळंदी देवस्थानच्या पद्मावती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली

ओढ्याला आलेल्या पूरामुळे आळंदी देवस्थानच्या पद्मावती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली.

#PuneRains : आळंदी देवस्थानच्या पद्मावती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली

sakal_logo
By
विलास काटे

आळंदी ः वादळी पावसामुळे आळंदीसह परिसरात शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अवैध बांधकामांमुळे बंद झाल्याने अनेकांच्या दुकानात पाणी शिरले. तर ओढ्याला आलेल्या पूरामुळे आळंदी देवस्थानच्या पद्मावती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुधवारी पावसाचे प्रमाण एवढे होते की, रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. सिमेंटचे रस्ते केल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरू लागल्याने नागरिकांची तारांबळ झाली. ठिकठिकाणी झालेल्या अवैध बांधकाम, तुंबलेली गटारांमुळे शहरात अनेकांच्या दुकानात पाणी शिरले.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

घुंडरे गल्ली, भराव रस्ता येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. प्रदक्षिणा रस्त्यावरिल धर्मशाळांच्या आवारात पावासचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. तसेच गटाराचे सांडपाणीही रस्त्यावरून वाहत होते. एवढेच नाही तर आळंदी देवस्थानच्या पद्मावती मंदिरात पाणी शिरल्याने फुलझाडे आणि तुळशीच्या रोपांची नुकसान झाले. मंदिराने दहा वर्षापू्र्वी मंदिर परिसर विकसित करताना येथील ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करून चिंचोळ्या स्वरूपात बांधकाम केले. ओढ्याचा पाण्याचा प्रवाह मोठा होता की मंदिरात पाणी शिरले. परिणामी कालच्या पावसाने मंदिराची संरक्षक भिंतच कोसळली. संरक्षक भिंतीचा तुटलेला भाग नेमका ओढ्यावरिल साकव पूलावर पडल्याने पुलाचेही नुकसान झाले.

पाउस रात्रभर पडल्याने अनेकांच्या पिकात पाणी शिरले.पावसामुळे सोयाबिन,पालेभाज्याच्या नुकसानीबरोबरच बाजरी,ज्वारीची पिके आडवी झाल्याने आळंदी आणि परिसरातील शेतक-यांचे नुकसान झाले. पद्मावती मंदिर परिसरातील अनेक शेतक-यांची पाईपलाईनचेही नुकसान झाले.एकंदर कालच्या पावसाने आळंदीत नागरिकांसह शेतक-यांचीही दैना उडवली.

Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

राज्य तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून वीस कोटीहून अधिक रूपये खर्चून सांडपाणी आणि पावसाची पाणी वाहून नेणारी पाईपलाईन योजना बनवली. मात्र कालच्या पावसाने दोन्ही यंत्रणा कुचकामी ठरल्या. पावसाचे पाणी वाहून नेणा-या बंद पाईपातून पाणी वाहण्याऐवजी रस्त्यावरून वाहत होते. तर गटारलाईन सफाई न केल्याने सांडपाणीही रस्त्यावर वाहत होते.शासनाने पैसे खर्च केले मात्र आळंदीकरांचा मुळ प्रश्न काही मार्गी लागला नसल्याचे पावसामुळे उघड झाले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)