
Protest Against HSRP: सरकारनं २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना नवी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. त्यासाठी वाहन मालकांना याचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. पण याविरोधात आता लोकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, या एका सार्वजनिक विषयावर जनजागृतीसाठी पुण्यात गुडलक चौकात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन बुधवारी निषेध आंदोलन केलं.
यावेळी नागरिकांना याबाबत माहितीच नसल्याचं धक्कादायक वास्तवही समोर आलं. त्यामुळं याबाबत शासनाकडून कुठलाही प्रसिद्धीचा कार्यक्रम राबवलेला नाही. त्यामुळं याबाबत नेमकी माहिती नसल्यानं या नंबर प्लेट्ससाठी पुण्यात काळाबाजारही सुरु झाला आहे.