esakal | पगार न मिळाल्याने PMPMLच्या चालकांचा संप
sakal

बोलून बातमी शोधा

पगार न मिळाल्याने पीएमपीएमएलच्या चालकांचा संप

पगार न मिळाल्याने पीएमपीएमएलच्या चालकांचा संप

sakal_logo
By
बाबा तारे

औंध : मागील दोन महिन्यांचा व चालू महिन्याचा असा एकूण तीन महिन्याचा पगार न मिळाल्याने पीएमपीएमएलच्या एमपीजी ग्रुप कंपनीच्या कंत्राटी चालकांनी आज सकाळी औंध येथील डेपोत संप पुकारला. यावर ''लवकरात लवकर उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही'' असे या चालकांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: शिरूर : मंदिरांचे दरवाजे उघडले जाणार; भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण

वेळेवर पगार दिला जात नाही, भविष्य निर्वाह निधीची रक्कम पगारातून कपात केली जाते परंतु, भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा केली जात नाही अशी तक्रारही या चालकांनी केली. तसेच जे चालक या विरोधात बोलतात त्यांना कुठलीही सुचना न देता अचानक कामावरून काढून टाकले जाते. त्यामुळे चालकांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध हा संप पुकारला गेला आहे.

हेही वाचा: पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआरचा मोबदला

पहिल्या लॉकडाऊनमध्ये चालकांनी काम करुनही त्याचा पगार सुद्धा अजून मिळालेला नाही अशा अनेक व्यथा या चालकांनी यावेळी मांडल्या. यावर लवकरात लवकर उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचे चालकांनी स्पष्ट केले.

loading image
go to top