

Sharad Pawar
बारामती - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने बळीराजाला सर्वतोपरी मदत करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
बारामतीत शनिवारी (ता. 3) माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी दुष्काळाबाबत संवेदनशीलपणे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून लोकांना मदत करण्याचा राज्य सरकारचा दृष्टिकोन स्वागतार्ह आहे. चारा, पाणी आणि महसूल माफी यांसारख्या मागण्या शेतकऱ्यांकडून होत आहेत. सार्वजनिक जीवनात काम करणारे अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. सरकारने त्यांना सहकार्य करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे.