पुण्यातील 'या' भागात 12 सप्टेंबरपासून जनता कर्फ्यू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

वाढती रुग्ण संख्या पाहता आज ग्रामपंचायत कार्यालयात तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. यामध्ये 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले. वाघोलीत गेल्या तीन दिवसापासून दररोज 35 रुग्ण आढळून येत आहेत. आठ दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडलेल्या एकाच कुटुंबातील 22 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण मंगळवारी आढळून आले. त्यानंतर तो परिसर तातडीने सील करण्यात आला.

वाघोली (पुणे) : वाढती रुग्ण संख्या पाहता आज ग्रामपंचायत कार्यालयात तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. यामध्ये 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले. वाघोलीत गेल्या तीन दिवसापासून दररोज 35 रुग्ण आढळून येत आहेत. आठ दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडलेल्या एकाच कुटुंबातील 22 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण मंगळवारी आढळून आले. त्यानंतर तो परिसर तातडीने सील करण्यात आला.

अरे बापरे! भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई

वाघोलीची रुग्णसंख्या 924 वर पोहचली आहे. आज 9 रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 232 एवढी आहे. या पार्श्‍वभूमीवर आज ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत वाढत्या रुग्ण संख्येवर चर्चा करण्यात आली. 

पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच मालती गोगावले, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public curfew in Wagholi from September 12