Corona Updates : पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या चारशेच्या आत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये 113, जिल्हा परिषद क्षेत्रात 80, नगरपालिका
क्षेत्रात 37 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 9 नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता.2) दिवसभरात फक्त 372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 24 हजार 666 झाली आहे. दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 133 जण आहेत. सोमवारी 4 हजार 179 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

याशिवाय सध्या जिल्ह्यातील पाच हजार 232 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील अवघे 1 हजार सात रुग्ण आहेत. दरम्यान दिवसभरात 715 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण कोरोनामुक्तांची संख्या आता 3 लाख पाच हजार 265 झाली आहे. याशिवाय आतापर्यंत 7 हजार 927 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आज दिवसभरातील 20 रुग्णांचा समावेश आहे.

राजकारण सोडेन पण भाजपसोबत जाणार नाही; मायावतींचे स्पष्टीकरण​

सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये 113, जिल्हा परिषद क्षेत्रात 80, नगरपालिका
क्षेत्रात 37 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 9 नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 15 जण आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील 1, जिल्हा परिषद आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येकी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज कॅंटोन्मेंट क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही रविवारी (ता.1) रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी (ता.2) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 371 मृत्यू आहेत.

विदेशी स्कॉचच्या बाटल्यांतून विकायचे बनावट मद्य; पुण्यातील रॅकेटचा पर्दाफाश​

दरम्यान, आतापर्यंत एकूण 14 लाख 29 हजार 63 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी पुणे शहरातील 7 लाख 40 हजार 641 चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 4 लाख 8 हजार 549, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात एक लाख 99 हजार 520, नगरपालिका क्षेत्रात 62 हजार 222 आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रात 18 हजार 131 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 372 new corona patients found on Monday 2nd November