esakal | पुणेकरांनो, कोरोनाचा आकडा वाढतोय; आणखी नव्या ५०० रुग्णांची पडली भर!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Patients

आजतागायत ५४५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १३ पुरुष आणि चार महिला आहेत.

पुणेकरांनो, कोरोनाचा आकडा वाढतोय; आणखी नव्या ५०० रुग्णांची पडली भर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात कोरोनाने 'गुणाकार' सुरू केल्याचे आकडे पुढे येऊ लागले असून, एका दिवसांत म्हणजे, बुधवारी (ता.२४) सर्वाधिक नवे ५०१ रुग्ण सापडले आहेत. तर याच कोरोनाने १७ जणांचा जीव घेतला आहे. गंभीर म्हणजे, २७७ रुग्ण अत्यावस्थ असून, ५७ जणांना व्हेंटिलेटरची गरज भासली आहे. अर्थात, कोरोनाने खरोखरीच आवाका वाढल्याचे निमित्ताने स्पष्ट आहे.

- लॉकडाउनमध्येही 'आरटीओ' मालामाल; तिजोरीत जमा झाली एवढी गंगाजळी!

दुसरीकडे, रुग्ण संख्या वाढली असतानाच उपचार घेणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक आहे. सध्या पाच हजार रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत सुमारे सव्वाआठ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजतागायत ५४५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १३ पुरुष आणि चार महिला आहेत.
कोंढव्यातील २९ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांना न्युमोनिया होता. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्या उपचार सुरू होते.

- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सव्वा लाख शेतकऱ्यांचे पीक कर्ज झाले माफ!

कोथरुडमधील ३० वर्षांच्या पुरुषाचा जीव गेला असून, त्यांना उच्चरक्तदाब, मधुमेह होता. सहकारनगरमधील ३७ वर्षाच्या पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. मधुमेह आणि न्युमोनिया होता. धनकवडीतील ५३ वर्षाच्या पुरुष मरण पावला आहे. त्याचवेळी हदयाचा त्रास असलेल्या गंज पेठेतील पुरुषचाही मृत्यू झाला आहे. येरवडा येथील ६० वर्षांचा रुग्ण मरण पावला असून, त्यांनाही अन्य आजार होते.

- पिवळे-केशरी रेशनकार्डधारकांनो, महापालिकेने तुमच्यासाठी घेतलाय महत्त्वाचा निर्णय!

कोथरुडमधील ४५ वर्षाची महिला मरण पावली आहे. त्यांना न्युमोनिया होता. लष्कर परिसरातील ५१ वर्षांच्या महिलेचा बळी गेला आहे. त्याना मधुमेह होता. येरवड्यातील ५० वर्षांच्या पुरुषाला मधुमेह होता. त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. नाना पेठेतील ७१ वर्षांचा पुरुष मरण पावला आहे. तेव्हाच, हडपसरमधील दोन आणि सदाशिव पेठेतील एकाचा मृत्य झाला असून, या तिघांनाही इतर आजार होते.

- यंदा शुभमंगल पण 'सावधानच'; काय आहेत कारणे?

ताडीवाला रस्त्यावरील ६३ वर्षांची महिला मरण पावली आहे. तिला मधुमेह आणि उच्चरक्तदाब होता. हडपसरमधील ६० वर्षाच्या मधुमेह, उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, धनकवडीतील ७८ वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यांना उच्चरक्दाब आहे. दिवसभरात सर्वाधिक ३ हजार ४१६ जणांची तपासणी झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

loading image