esakal | पुणे : ६४ वर्षाच्या तरुणाची अजब कामगिरी....
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे : ६४ वर्षाच्या तरुणाची अजब कामगिरी....

sakal_logo
By
सोमनाथ भिले, डोर्लेवाडी

डोर्लेवाडी : डोर्लेवाडीचे (ता. बारामती) सुपुत्र व पुण्याचे उद्योजक दशरथ जाधव यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. सलग चार वर्षे आर्यनमॅन पुरस्कार मिळवून सर्वात वृद्ध भारतीय आर्यनमॅन बनण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. मनात तीव्र इच्छा शक्ती व कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठलेही ध्येय साध्य करायला वयाची मर्यादा येत नाही हे पुण्याच्या ६४ वर्षीय दशरथ जाधव यांनी साध्य करून दाखवले आहे. आपला सिमेंट विक्रीचा व्यवसाय सांभाळून वयाच्या ६४ व्या वर्षी सलग चार वेळा खडतर असा आयर्नमॅन किताब त्यांनी मिळवून दाखवला आहे. आणि हा किताब मिळवणारे सर्वात वृद्ध भारतीय हा बहुमान देखील त्यांना मिळाला आहे.

जर्मनीतील हाँगबर्ग येथे २९ ऑगस्ट रोजी झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत दशरथ जाधव यांनी बाजी मारली आहे. १६ तासाची ही स्पर्धा त्यांनी १४ तास १२ मिनिटांत पूर्ण करून तरुणांपुढे एक आदर्श ठेवला आहे. गतवर्षीही त्यांनी वयाच्या ६3 व्या वर्षी आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करून आर्यन मॅन किताब मिळवला होता.

हेही वाचा: परंपरेची नग्नता; पावसासाठी अल्पवयीन मुलीचा छळ!

फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉरपोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित एक लांब-अंतर ट्रायथलॉन रेस आहे, यात ४ किमी पोहणे, १८० किमी सायकल चालवणे आणि ४२ किमी धावणे समाविष्ट आहे. त्या क्रमाने आणि ब्रेकशिवाय स्पर्धा पूर्ण करायची असते. आयर्नमॅन स्पर्धा म्हणजे संपूर्ण जगात सर्वात कठीण एक दिवसीय सहनशीलता कार्यक्रम आणि स्पर्धकांचा कस पाहणारी स्पर्धा असते. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पोहणे, धावणे आणि सायकलिंगचा नियमित सराव केल्यामुळे ही स्पर्धा सलग चार वर्षे पूर्ण करू शकलो आहे. मनाची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुणांनी या स्पर्धेत भाग घ्यायला हवा. पुणे शहर व ग्रामीण भागातील तरुणांना या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणार आहे

- दशरथ जाधव आयर्नमॅन स्पर्धा विजेते

loading image
go to top