Coronavirus : दिवसभरात सापडलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येने पुणेकरांची वाढली धाकधूक!

Corona-Patients
Corona-Patients

पुणे : कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येने पुणेकरांची धाकधूक वाढली असतानाच बुधवारी दिवसभरात नवे 35 रुग्ण बरे झाले आहेत. तर याआधी सोडलेल्या 87 रुग्ण ठणठणीत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

परिणामी, आतापर्यंत 122 लोक कोरोनामुक्त झाले आहे. गंभीर बाब म्हणजे, दिवसभरात आणखी 64 रुग्ण सापडल्याने पुण्यातील रुग्णांचा आकडा 772 पर्यंत गेला आहे, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. 

शहरात गेल्या सहा दिवसांपासून रोज 50 पेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ही संख्या झपाट्याने वाढत आहे.तेव्हा गेल्या तीन दिवसांपासून पुणेकरांना दिलासाही मिळत आहे. याआधी रविवारी (ता.19) आणि मंगळवारी (ता.21) या दोन दिवसांत 37 रुग्ण बरे झाले आहे. तर बुधवारी एकाच दिवसांत 35 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 
विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या 23 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर मृतांची एकूण संख्या 55 झाली आहे. 

हडपसरमधील 53 वर्षांच्या पुरुषाला त्रास होत असल्याने 20 17 एप्रिलला रुग्णालयांत दाखल केले होते. त्यांना कोरोना झाल्याने निष्पन्न होताच उपचार सुरू केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उच्चरक्तदाब आणि अन्य काही आजारही होते. 

पर्वती दर्शतील येथील 65 वर्षाच्या पुरुषाचाही मृत्यू झाला असून, त्यांना 19 एप्रिलाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या व्यक्तीला अन्य प्रकारचे आजार होते. 

भवानी पेठेतील 56 वर्षांच्या महिलेला त्रास होत असल्याने 20 एप्रिलला रुग्णालयांत दाखल केले होते. त्यानंतर बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. या महिलेलाही अन्य आजार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com