
कोरोनाचा संसर्ग आणि त्यापासूनचा मृत्यू म्हणजे हमखास ज्येष्ठ नागरिक डोळ्यापुढे येतात. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू झाला असला तरी, त्यात सर्वाधिक साठीच्या पुढच्या नागरिकांचा समावेश आहे. त्याशिवाय, नव्या रुग्णांच्या संख्येतही ज्येष्ठांचा आकडा मोठा आहे.
पुणे : वयाची साठी ओलांडलेले, कोरोनाचा संसर्ग झालेले आणि उपचारांत 'व्हेंटिलेटवर' आलेल्या चार ज्येष्ठ नागरिकांसह सात जणांनी कोरोनाला हरविले आहे. विशेष म्हणजे, या सातही जणांना उच्चरक्तदाब, मधुमेह आणि अन्य आजार असूनही ते कोरोनामुक्त झाले आहेत. सलग 14 दिवसांच्या उपचारानंतर ही मंडळी बुधवारी दुपारी आपापल्या घरी गेले आहेत. अर्थात, उपचारानंतर ज्येष्ठ नागरिक; त्यातही इतर आजार असणारेही बरे होऊ शकतात, हेच यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाचा संसर्ग आणि त्यापासूनचा मृत्यू म्हणजे हमखास ज्येष्ठ नागरिक डोळ्यापुढे येतात. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू झाला असला तरी, त्यात सर्वाधिक साठीच्या पुढच्या नागरिकांचा समावेश आहे. त्याशिवाय, नव्या रुग्णांच्या संख्येतही ज्येष्ठांचा आकडा मोठा आहे.
- Coronavirus : पुण्याच्या महापौरांचे पत्र व्हायरल; रोहित पवारांनी केला खुलासा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अशा स्थितीत ससून रुग्णालयांत उपचार घेत असलेले सातजण कोरोनापासून मुक्त झाले आहेत. येरवडा, गुलटेकडी, मुकुंदनगर आणि गंज पेठेतील 65 वर्षाच्या आणि शुक्रवार पेठ, गणेशनगर, पर्वती येथील पन्नाशीच्या व्यक्तींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न होताच ससूनमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले. यातील काहीजणांना 'व्हेंटिलेटर'वरही ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली. परंतु, त्यांनर उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत हे सातजण बरे झाल्याचे ससून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास