esakal | Coronavirus : सोमवार ठरला दिलासादायक; पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या घटली!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Patient

कोंढव्यातील 38 वर्षाच्या पुरुषाला कोरोना झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाल्यानंतर काही तासाच त्यांचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला मूत्रपिंडाचा त्रास होता होता. ​

Coronavirus : सोमवार ठरला दिलासादायक; पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या घटली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांना गेली पाच दिवस भयभीत केलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा थोडासा कमी झाला असून, सोमवारी (ता.27) दिवसभरात ही नवे 78 रुग्ण सापडले आहेत. तर, 11 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध रुग्णालयांत कोरोनाचे 966 रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 75 जण मरण पावले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, गेल्या काही दिवस उपचार सुरू असूनही 49 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. सध्या रोज विविध भागांतील 600 ते 650 लोकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार आतापर्यंत 7 हजार 675 जणांची तपासणी झाली असून, त्यातील 6 हजार 558 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 217 जणांना जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट आहे. त्यातही 75 जणांचा मृत्यू आणि 176 जण बरे झाल्याने आता 966 रुग्ण दाखल आहेत. गेल्या पाच दिवसांत रोज 80 ते शंभर रुग्ण सापडले आहेत. 

- बापरे, कोरोना मृत्युदरात झाली वाढ; मेघालय एक नंबर तर महाराष्ट्र...!

घोरपडी गावातील 64 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांना बरे नसल्याने 18 एप्रिलला रुग्णालयांत दाखल करण्यात आला. मात्र, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल 24 एप्रिलला आला. त्यानंतर रविवारी रात्री त्यांना मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले.

पर्वती येथील 48 वर्षीच्या महिलेचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. त्या 16 एप्रिलपासून ससूनमध्ये होत्या; त्यांना कोरोना झाल्याचे 18 एप्रिलला निष्पन्न झाले होते. मात्र, सोमवारी त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांना रक्तदाब, मधुमेह याचा त्रास होता. 
कोंढव्यातील 38 वर्षाच्या पुरुषाला कोरोना झाल्याचे सोमवारी निष्पन्न झाल्यानंतर काही तासाच त्यांचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला मूत्रपिंडाचा त्रास होता होता. 

- Coronavirus : पुणे झेडपीचा गरिबांना मदतीचा 'हात'; २५ ते ७५ हजारांपर्यंत आर्थिक मदत देणार!

पुण्यात सापडलेले रुग्ण 78
बरे झालेले रुग्ण 11 
बरे झालेले एकूण रुग्ण  175 
मृत 
एकूण मृत  75
loading image