esakal | बापरे, कोरोना मृत्युदरात झाली वाढ; मेघालय एक नंबर तर महाराष्ट्र...!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Death

देशातील अकरा राज्य व केंद्रशासित प्रदेशात एकही मृत्यू झालेला नाही.

बापरे, कोरोना मृत्युदरात झाली वाढ; मेघालय एक नंबर तर महाराष्ट्र...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मागील दोन दिवसांपूर्वीच्या तुलनेत सोमवारी (ता.२७) पुन्हा किंचित वाढ झाली आहे. सध्या हा मृत्युदर ४.२४ टक्के एवढा आहे. तरीही हे प्रमाण गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत कमीच आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन दिवसांपूर्वी राज्याचा मृत्यूदर ४.२२ टक्के झाला होता. दरम्यान, देशात सर्वाधिक ८.३३ टक्के मृत्युदर हा मेघालयाचा आहे. देशात दुसऱ्या क्रमांकावर पंजाब तर, तिसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेश राज्य आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. ही टक्केवारी २७ एप्रिलच्या सकाळी दहा वाजेपर्यंतची आहे.

- Coronavirus : पुणे झेडपीचा गरिबांना मदतीचा 'हात'; २५ ते ७५ हजारांपर्यंत आर्थिक मदत देणार!

सोमवार अखेरपर्यंत देशात कोरोनामुळे ८७२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३४२ जणांचा समावेश आहे. पंजाबचा मृत्यू दर ५.७५ टक्के, मध्यप्रदेशचा ४.९१ टक्के, तर गुजरातचा ४.३७ टक्के इतका आहे. कर्नाटक, झारखंड या तीन राज्यांचा दर तीन टक्क्यांहून अधिक आहे.

आंध्रप्रदेश, आसाम, तेलंगणा, हिमाचल प्रदेश या चार राज्यांच्या मृत्युदर हा दोन टक्क्यांहून अधिक तर तीन टक्क्यांच्या आत आहे. ओरिसा, केरळ आणि बिहारमधील मृत्यूचे प्रमाण एक टक्क्याच्या आत आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, हरियाणात दोन टक्क्यांपेक्षा कमी प्रमाण आहे. 

- लॉकडाऊनमध्ये तंबाखू विकणाऱ्याकडनं पोलिसांनी घेतला 'हप्ता' अन् मग...

अकरा राज्य व केंद्रशासित प्रदेशात एकही मृत्यू नाही

दरम्यान, देशातील अकरा राज्य व केंद्रशासित प्रदेशात एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उत्तराखंड, अंदमान निकोबार, चंदीगड, दिल्ली, लडाख, पाॅंडेचरी आदींचा समावेश आहे.

तुलनात्मक मृत्युदर :

जग ६.९१ टक्के.
भारत ३.१३ टक्के.
महाराष्ट्र ४.२४ टक्के.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा