

पुणे, ता. ९ ः शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. हडपसरमधील मगरपट्टा, अहिल्यानगर रस्ता, तसेच खराडी भागात या घटना घडल्या. खराडी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. संगीता पांडुरंग कारभारी-पाटील (वय ३९, रा. निर्मल टाउनशिप, ससाणेनगर, हडपसर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याबाबत संगीता यांचे पती पांडुरंग कारभारी-पाटील (वय ४३) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर लोणीकंद भागात ट्रकच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी ही घटना घडली. शांताबाई रघुनाथ जाधव (वय ७२) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल झाला. जाधव यांचे भाऊ किसन हनुमंता देवकर (वय ७७, रा. वरुड, ता. जिंती, जि. परभणी) यांनी लाेणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिसऱ्या घटनेत मगरपट्टा भागात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. झिशान अफसर शेख (वय १९, रा. सादाफ टाॅवर, लष्कर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत शेख अफसर बशीर मियाँ (वय ५४, रा. चिंचगव्हाण, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.