Pune : वारजे-रामनगर परिसरात दहशत पसरविणाऱ्या टोळीवर 'मोका' अंतर्गत कारवाई

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आदेश
crime news
crime newscrime news

पुणे : वारजे येथील रामनगर परिसरामध्ये विविध प्रकारचे गुन्हे करून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंड निलेश गायकवाड व त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

निलेश विजय गायकवाड, अरविंद मारूती माडकर, अक्षय महेश यादव, अक्षय रवींद्र खवळे, संकेत राजेंद्र ढेणे, विकास कैलास गव्हाड, विकी धर्मा काळे, मोन्या सुभाष मोरे, कार्तिक संजय इंगवले (सर्व रा. वारजे माळवाडी), ह्रतिक कैलास एखंडे (रा. म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे), अनिरूद्ध राजू जाधव (रा. रावेत, पिंपरी चिंचवड) अशी "मोका'अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. एनडीए रस्त्यावरील शिवणे स्मशानभूमी परिसरात गायकवाड आणि साथीदारांनी ऑगस्ट महिन्यात पुर्ववैमनस्यातून केदार भालशंकर (रा. रामनगर, वारजे माळवाडी) याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला होता.

crime news
लवकरच क्रिप्टो विधेयक आणणार; सीतारमण यांची राज्यसभेत माहिती

या घटनेत भालशंकर गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, गायकवाड व त्याच्या साथीदारांनी वारजे परिसरात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे केले होते. त्यांच्याविरुद्ध "मोका'अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर यांनी परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तांमार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर केला होता. पोलिस आयुक्त गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त गजानान टोम्पे करीत आहेत. पोलिस आयुक्त गुप्ता यांनी मागील वर्षभरात सराईत गुन्हेगारांच्या 61 टोळ्यांविरुद्ध "मोका'नुसार कारवाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com