पुणे: गोळीबार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

गोळीबार झाल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती
crime case pune
crime case punesakal

पुणे: बिबवेवाडी परिसरात टोळक्याने दहशत निर्माण करत एका तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुण पळाल्यामुळे तो बचावला. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली. रविवारी (ता. ६) मध्यरात्री हा प्रकार घडला.

crime case pune
Pune : ५० हजार जणांचे सवलतीच्या दरात डायलिसीस

याबाबत अमित कैलास थोपटे (वय ३२, रा. शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सौरभ सरवदे, रूपेश सोनवणे ऊर्फ डिजे, नीलेश सोनवणे, गणेश जगदाळे, बाबा बडबडे, अनिल कांबळे व इतर पाच ते सहा जणांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोपटे यांचे दत्तवाडी परिसरात सलून आहे. त्यांचा शुक्रवारी (ता.४) आरोपींसोबत वाद झाला होता. बिबवेवाडीतील शिव शंकर सोसायटी समोर तक्रारदार, त्यांचा भाऊ व इतर मित्र हे रविवारी रात्री अकराच्या सुमारास गप्पा मारत उभे होते.

crime case pune
Kirit Somaiya : हल्ला प्रकरणी आणखी एका शिवसैनिकाला केली अटक

शुक्रवारी झालेल्या भांडणावरून आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात काठ्या, कोयते होते. परिसरात येतानाच ते आरडा-ओरडा करत आले. ‘तुला खल्लास करतो,’ असे फिर्यादी यांना म्हणत सौरभ सरवदे याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. हा सर्व प्रकार पाहून अमित, त्यांचा भाऊ व इतर सर्वजण पळाले. त्यावेळी आरोपीने थोपटे याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. पण, थोपटे याने गोळी चकुविल्यामुळे तो जखमी झाला नाही. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली. गोळीबार झाल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर टोळके पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी टोळक्यातील आरोपींचा शोध सुरू केला आहे. थोपटे याची पूर्वी आरोपींसोबत झालेल्या वादातूनच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com