Pune Aundh Leopard Search
esakal
रविवारी पहाटे औंध येथील ब्रेमेन चौक परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वनविभागाकडून या भागात रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, यावेळी कुठेही बिबट्या किंवा त्याच्या असण्याचा पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे औंध परिसरातील बिबट्या नेमका कुठं गेला? असा प्रश्न विचारला जातो आहे.