पुणे: भाजपची हुल्लडबाजी; नागरिकांचे हाल

सायंकाळी साडे चारच्या सुमारास सौमय्या यांचा कॉनव्हाय महापालिकेत आला
भाजप नेते किरिट सोमय्या
भाजप नेते किरिट सोमय्याsakal

पुणे: भाजप नेते किरिट सोमय्या महापालिकेत येणार म्हणून आज (ता. ११) सकाळपासून मनपा भवनात व परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचा फटका कामानिमित्त आलेल्या नागरिकांना बसला. महापालिकेत प्रवेश मिळत नव्हता, गेटच्या बाहेर नागरिकांना अडवून ठेवल्याने त्यांचे हाल झाले. मात्र, सोमय्या महापालिकेत येताना भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक काढली. प्रचंड ढकलाढकली करून, आरडाओरडा करत हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी सोम्‍म्य लाठीचार्ज केला. या गोंधळामुळे खुद्द सोमय्या यांना थाप लागून, काही काळ थांबण्याची वेल आली.

भाजप नेते किरिट सोमय्या
डॉ. प्रमोद चौधरी ठरले जैव अर्थव्यवस्थेतील जीवनगौरव पुरस्काराचे पहिले आशियायी मानकरी

शनिवार व रविवारी पालिका बंद असणार असल्याने नागरिकांना आतमध्ये सोडण्याची गयावया केली, पण त्यांना प्रवेश दिला नाही. त्यामुळे नागरिक हातबलपणे थांबून होते. दुपारी तीननंतर अनेक अधिकारी भेटतात, कामे होतील, या आशेने नागरिक आले पण त्यांनाही प्रवेश दिला नाही.

सायंकाळी साडे चारच्या सुमारास सौमय्या यांचा कॉनव्हाय महापालिकेत आला. मुख्य इमारतीसमोर काही काळ सोमय्या थांबले, त्यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सभागृहनेते गणेश बीडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सोमय्या हे गाडीतून खाली उतरतील असे वाटले होते, पण काही काळात त्यांचा कॉनव्हॉय महापालिकेतून बाहेर पडला आणि थेट शेजारील भाजप पक्ष कार्यालयात गेला. सोमय्या हे महापालिकेतून का निघून गेले हे कोणालाच काही कळाले नाही. काही वेळाने पक्ष कार्यालयातून शहराध्यक्ष जगदीश मुळीक व कार्यकर्त्यांनी सोमय्या यांची मिरवणूक काढली. पोलिसांनी या मिरवणूक अडविल्याने जोरदार ढकलाढकली सुरू झाली. यावेळी पोलिसांनी लाढीचार्ज केल्याने काही कार्यकर्ते व महिलांना प्रसाद मिळाला. गर्दीचा रेटा थेट गेटवर आल्याने तेथे महापालिकेच्या गेटवर चढून कार्यकर्ते आंदोलन करत होते. त्यामुळे हे गेट उघडावे लागले.

भाजप नेते किरिट सोमय्या
दगडूशेठ गणपतीला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

घटनाक्रम

  • दुपारी दोन - नागरिकांना महापालिकेत प्रवेश बंद, सायंकाळी पाच पर्यंत येण्यास सांगण्यात आले.

  • दुपारी चार - नगरसेवक, कार्यकर्ते महापालिकेच्या पायऱ्यांवर जमा

  • सायंकाळी ४.१५- पोलिसांकडून महापालिच्या आतील भाग, सर्व गेटवर बंदोबस्त वाढवला.

  • सांयकाळी ४.३० - सोमय्या यांचा ताफा बाहेर (एक्झिट) जाण्याचे गेटने आत आला. काही काळ थांबला. त्यानंतर आय (इन) येण्याच्या गेटने बाहेर पडला

  • सायंकाळी ४.३५ - सोमय्या यांची मिरवणूक महापालिका गेटसमोर पोलिसांनी अडवली. सौम्य लाठीचार्ज, महिला व कार्यकर्त्यांना प्रसाद

  • ४.३८ - भाजप कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने गेट उघडायला भाग पाडले

  • ४.३९- किरिट सोमय्या यांना दम लागल्याने बाजूला घेतले, तेथेही घोषणाबाजी सुरू

  • ४.४१ - पालिकेच्या पायऱ्यांवर पोहतचात ‘एकच भाई किरिट भाई’च्या घोषणा

  • ४.४३ - महापालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्या यांचा सत्कार

  • ४.४४ - आयुक्तांना भेटण्यासाठी सोमय्या हे गेले

  • ५.५१ - सोमय्या यांची भेट झाल्यानंतर पत्रकार परिषद, ठाकरे सरकारवर आरोप

  • ६.०० - सोमय्या महापालिकेतून बाहेर आणि कार्यालये बंद होण्याच्या वेळी नागरिकांना दरवाजे खुले

  • ६.१२ - काँग्रेसने गोमूत्र टाकू पायरीचे शुद्धीकरण केल्याचा दावा

‘‘माझ्या पीएफचे काम असल्याने महापालिकेत आले, पण तीन पासून मला प्रवेश दिला नाही. आता सहा वाजलेच काम होईल का ते माहिती नाही.’’

एक महिला, निवृत्त मनपा कर्मचारी

‘‘शहरी गरीब योजनेचे बिल, पाससाठी नागरिक आले होते. ते चार तासापासून थांबून होते, त्यांना प्रवेश दिला नाही. पण भाजपचे नगरसेवक व कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला. नागरिकांचे हाल करणाऱ्यांना पुणेकर माफ करणार नाहीत. आम्ही याविरोधात आंदोलन केले’’

डॉ. अभिजित मोरे, प्रवक्ता, आप

‘‘गोंधळ घालण्याचा प्लान नव्हता, आम्ही हुल्लडबाजी केली केली नाही. आम्हाला शांततेमध्येच सोमय्यांजीना महापालित आणायचे होते. मोजके लोक आयुक्तांना भेटण्यासाठी जाणार होते. पण तसे झाले नाही. आम्हाला महापालिकेबाहेर अडविण्यात आले, गेटचे दरवाजे उघडले गेल्याने अचानक कार्यकर्ते आतमध्ये आले, थोडासा गोंधळ झाला. पोलिसांनी लाठीजार्च झाल्याने हा गोंधळ झाला.’’

जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप

‘‘सोमय्या यांच्यावर पूर्वनियोजित हल्ला होता. जम्बो रुग्णालयांच्या खिरापतीसारखी देण्यात आली, मदती ऐवजी पात्र नसलेल्या संस्थाना काम देण्यात आले. किरिटजी महापालिकेत येणार होते, त्यामुळे आलो, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला, त्याचीही चौकशी झाली पाहिजे. आंदोलन सुरू असताना नागरिकांच्या कामासाठी सोय असणे आवश्‍यक आहे.’’

गिरीष बापट, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com