

Controversy Surrounds Suspended Tehsildar
Sakal
पुणे : बोपोडी येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा इतिहास मोठा ‘रंजक’ असल्याचे पोलिसांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीवरून समोर आले आहे. नायब तहसीलदार ते तहसीलदार पद या सेवेच्या कार्यकाळात चार वेळा त्यांचे निलंबन झाले आहे. पूर्व इतिहास माहिती असूनही अशा अधिकाऱ्याला पुणे शहराचे तहसीलदार करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे आज जिल्हा प्रशासनाला बदनामीला तोंड द्यावे लागत असल्याची नाराजी अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली.