'पुन्हा लॉकडाऊन नको, अन्यथा...'; पुणे व्यापारी महासंघाचं काय आहे म्हणणं?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१०) बैठक घेतली. त्यामध्ये पुणे शहरात पुन्हा 13 जुलैपासून दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे : कोविड-19 वर लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा जाहीर करू नये, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने एका पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाला केली आहे. अन्यथा सध्याचे वातावरण पाहता उद्रेक होण्याची शक्‍यता आहे, असे महासंघाने निदर्शनास आणून दिले आहे. 

'सारथी' संस्थेबाबत अजित पवारांची स्पष्ट भूमिका; काय म्हणाले पाहा!​

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१०) बैठक घेतली. त्यामध्ये पुणे शहरात पुन्हा 13 जुलैपासून दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरून शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या निर्णयास पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी पत्रक काढून पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये, अशी मागणी केली आहे. 

बेशिस्तपणामुळे आली पुन्हा लाॅकडाऊनची वेळ; उपमुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण​

पुन्हा लॉकडाऊन केल्यास व्यवसायात मोठी हानी होणार असून ती सहन करण्यापलीकडे असणार आहे. तसेच होणारी आर्थिक आणि मानसिक नुकसान कधीही भरून येणार नाही. व्यापाऱ्यांमध्ये मानसिक ताण वाढत असून उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मानसिक आणि आर्थिक वैफल्यातून काही व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे प्रमाण पुन्हा लॉकडाऊन केल्यानंतर वाढण्याची भीती आहे.

Breaking : विद्यार्थ्यांनो, आता 'अशा' होणार परीक्षा; 'यूजीसी'ने जाहीर केली नियमावली!​

त्यामुळे लॉकडाऊन न करता शहरातील सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक ती उपयोजना सर्व दुकानदारांनी केली असल्याचे त्या त्या असोसिएशनकडून हमीपत्र घेऊन दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असेही महासंघाच्या पत्रात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Chamber of Commerce has demanded that the lockdown should not be reannounced