esakal | इरसाल पुणेकरांची भन्नाट कारणं; पोलिसांना हसू आवरेना

बोलून बातमी शोधा

Pune Police

संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्या तरुणाला अडवून पोलिसांनी त्याला बाहेर पडण्याचे कारण विचारले तेव्हा ‘दुकानात दूध परत करण्यासाठी जात आहे’, असे त्या तरुणाने पोलिसांना उत्तर दिले.

Video : इरसाल पुणेकरांची भन्नाट कारणं; पोलिसांना हसू आवरेना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘दुकानामध्ये दूध परत करण्यासाठी चाललोय’, ‘कबुतरांना दाणा-पाणी द्यायचाय म्हणून निघालोय’, ‘बँकेत पैसे भरायला निघालोय, हा पाहा मेसेज’ (विशेष म्हणजे चक्क रविवार असताना)...

पुणेकरांकडून ही टिपिकल पुणेरी उत्तरे सध्या पोलिसांना ऐकावी लागत आहेत. कोरोनामुळे शहरात कडक निर्बंध आहेत. साहजिकच नागरिकांनी घराबाहेर पडायचे नाही. तरीही काही पुणेकर हमखास बाहेर पडतात. पोलिस त्यांना अडवून चौकशी करतात तेव्हा त्यांच्याकडून मिळणाऱ्या या उत्तरांमुळे पोलिसांनाही हसू आवरत नाही. पण ही गंमत स्वतःबरोबरच पोलिसांच्याही जीवावर बेतू शकते, याचे भान मात्र अजूनही नाही, हे दुर्दैव!

हेही वाचा: RT-PCR चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह का येतात?

संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्या तरुणाला अडवून पोलिसांनी त्याला बाहेर पडण्याचे कारण विचारले तेव्हा ‘दुकानात दूध परत करण्यासाठी जात आहे’, असे त्या तरुणाने पोलिसांना उत्तर दिले. तर तर एकाने ‘कबुतरांना दाणापाणी द्यायचा आहे’, असे सांगून पोलिसांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. तर एका बहाद्दराने रविवारीदेखील बॅंक चालू असल्याचे सांगून आपण पैसे भरण्यासाठी जात आहोत, एवढेच नव्हे तर बॅंकेने त्याला पाठविलेला मेसेजही पोलिसांना दाखविण्याचा प्रयत्न केला. पोलिस रात्रंदिवस रस्त्यांवर गस्त घालत पुणेकरांचे कोरोनापासून संरक्षण करण्याचे काम करीत असतानाही काही नागरिक मात्र फुटकळ कारणे पुढे करून संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत.

हेही वाचा: राज्याला केंद्राकडून रेमडेसिव्हिरची मदत; ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

‘तो’ व्हिडिओ ट्विटरवर हीट
पोलिसांना आलेल्या अशा भन्नाट अनुभवांचा एक व्हिडिओ पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या @cppunecity या ट्विटरवर प्रसिद्ध झाला आहे. त्याला तब्बल ५०० लोकांनी रिट्विट केले आहे, तर साडेतीन हजार जणांनी लाईक केले आहे. याबरोबरच एकाहून एक सरस अशा हजारो कमेंटस्‌चा पाऊसही त्यावर पडला आहे.

हेही वाचा: 17 राज्यात कोरोनाची लस फ्री; पाहा संपूर्ण यादी

कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीतही काही नागरिक पोलिसांना किरकोळ कारणे सांगत घराबाहेर पडत आहेत. प्रत्येक वेळी खोटी कारणे सांगून रस्त्यावर येणे गैर आहे. त्यांचा हा बेजबाबदारपणा त्यांच्यासह इतरांच्या व पोलिसांच्याही जीवावर बेतू शकतो. हे नागरिकांनी ओळखून खबरदारी घेतली पाहिजे.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे