
पुणे - पुणेकरांच्या चिंतेत भर टाकणाऱ्या कोरोनाचा आवाका आता आणखीनच वाढू लागला आहे. गुरुवारी एकाच दिवसात शहरात नवे ९३७ रुग्ण सापडले आहेत. दुसरीकडे दिलासाही मिळाला असून, दिवसभरात सव्वासहाशे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १४ रुग्ण दगावले आहेत. मृतांचा आतापर्यंतचा आकडा पावणेसातशेवर पोचला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या ६ हजार ६९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाचा संपर्क झपाट्याने होऊ लागला असून, या आठवड्यात रोज सरासरी सहाशे रुग्ण सापडत होते. गेल्या दोन दिवसांत त्यात वाढ होऊन रोजचा आकडा सातशेच्या पुढे जाऊ लागला आहे. बुधवारी ८७७ रुग्ण सापडल्याने प्रचंड भीती निर्माण झाली असतानाच गुरुवारी पुन्हा ९३७ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ४ हजार ४१० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
शहरात आतापर्यंत सुमारे १ लाख २४ हजार १९८ नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यापैकीच्या १९ हजार ४२ जणांना कोरोना झाला होता. त्यातील ११ हजार ६७१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या ६ हजार ६९५ जण रुग्णालयांत आहेत.
पिंपरीत सापडले २३१ पॉझिटिव्ह
पिंपरी - शहरात गुरुवारी २३१ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३६०७ झाली. दिवसभरात ११५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पुण्यातील एका ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सध्या १४०५ जण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकूण २१५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.