पुणे शहरात आज नवे पावणेदोनशे कोरोना रुग्ण

पुणे शहरात आज (ता.१८) दिवसभरात पावणेदोनशे नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
corona patient
corona patientsakal

पुणे : पुणे शहरात आज (ता.१८) दिवसभरात पावणेदोनशे नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या (शुक्रवार) तुलनेत आज चार रुग्ण वाढले आहेत. आज दिवसभरात २५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज पिंपरी चिंचवडमध्ये ११९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३६३, नगरपालिका हद्दीत ६३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डमध्ये ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरातील पुणे जिल्ह्यातील एकूण नवीन कोरोना रुग्णांची संख्या ७३१ इतकी आहे.

जिल्ह्यातील १ हजार १२ जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्वाधिक ४७० रुग्णांसह, शहरातील २५३, पिंपरी चिंचवडमधील २१७, नगरपालिका हद्दीतील ६५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सात रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com