

Pune CNG Rate Increased by ₹2 Per Kg
esakal
पुणेकरांच्या खिशाला आणखी एक फटका बसणार आहे. पुणे शहरातील सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर पुण्यात सीएनजीचा नवीन दर १०० रुपये ५० पैसे प्रति किलो इतका झाला आहे. वाढीव दर आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण शहरात आणि ग्रामीण भागात लागू होणार आहेत.